Hot Posts

6/recent/ticker-posts

अपरिचित सामाजिक संस्था व दाळगे प्लाॅट वासीयांकडून ध्वजारोहण

 अपरिचित सामाजिक संस्था व दाळगे प्लाॅट वासीयांकडून ध्वजारोहण


स्वातंत्र्यदिना निमित्त मास्क व खाऊ वाटप
सोलापूर दि.१६(क.वृ.): अपरिचित सामाजिक संस्थेच्या वतीने ७४ व्या भारतीय स्वातंत्र्य दिना निमित्ताने लहान मुलांना मास्क व खाऊ वाटप करण्यात आले होते.
अपरिचित सामाजिक संस्थेच्या वतीने प्रमुख पाहुण्या सौ.सोनाली घोंगडे , अपरिचित सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मयुर गवते यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
यावेळी सौ.सोनाली घोंगडे , मयूर गवते यांच्या हस्ते लहान मुलांना मास्क देण्यात आले. यावेळी लवकरात लवकर कोरोनाच्या संकटातून भारत देश मूक्त होवो. असा आशावाद सौ.सोनाली घोंगडे यांनी व्यक्त केला तसेच भारतीय नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
तर सदर कार्यक्रमावेळी मयुर गवते यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य हजारो क्रातीकारकांच्या  बलिदानाने मिळालेला आहे तरि त्या क्रांतीकारकांची त्याच्या बलिदानाची आठवण जरी काढले तरि अंगावर शहारे येतात असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमा प्रसंगी साई देसाई ,निजगुणय्या हिरेमठ, आप्पा स्वामी, नरेश मुन्नुरेड्डी, पप्पु नागमोती, आप्पु चव्हाण,आनंद उंबरे,शुभम हंचाटे,श्रीकांत बच्चल,बापु विजापुरे, प्रशांत लकशेट्टि, रोहन नागमोती, आकाश मोरे, पंचाक्षरी हिरेमठ, प्रशांत हिबारे, सचिन हुंडेकरी, दादा पवार,गजु काटवा,प्रकाश मुन्नुरेड्डि, शुभम देठे, अनिकेत मुलगे,राहुल रंगापुरे, आदित्य सावंत, महेश देठे, अशोक खेडगिकर संस्थेचे सदस्य उपस्थिती होते.
Reactions

Post a Comment

0 Comments