Hot Posts

6/recent/ticker-posts

मुली शिकल्या तरच देशाचे भविष्य उज्वल : नंदिनीदेवी मोहिते पाटील

 मुली शिकल्या तरच देशाचे भविष्य उज्वल : नंदिनीदेवी मोहिते पाटील 


अकलूज दि.१६(क.वृ.): केवळ चूल व मुल या पुरताच स्त्रीचा  जन्म नाही तर देशाच्या उभारणीत स्त्रियांनी मोठी क्रांती केली आहे . आता विज्ञानयुग आहे . या युगात मुली शिकल्या तरच देशाचे भविष्य  उज्वल राहिल असे मत सौ . नंदिनीदेवी मोहिते पाटील यांनी व्यक्त केले . 
खुडूस जवळील फ्रटेली वाईन्स प्रा.लि. या संस्थेच्या वतीने कंपनीत काम करणाऱ्या महिलांच्या सुमारे १९ मुलींच्या शिक्षण व विवाह खर्चासाठी प्रत्येकी २० हजार याप्रमाणे ३ लाख ८० हजार रुपये खर्च करुन शंकरराव मोहिते पाटील सहकारी पतसंस्थेचा १३ महिने मुदत ठेवीचा धनादेश देण्यात आला . यावेळी आयोजित कार्यक्रमात सौ . मोहिते पाटील यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले . यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील , आ . रणजितसिंह मोहिते पाटील  , सत्यप्रभादेवी मोहिते पाटील , उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील , माजी सभापती वैष्णवीदेवी मोहिते पाटील , विश्वतेज मोहिते पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते . 
प्रारंभी फ्रटेली वाईन्सचे शेतकी अधिकारी दत्तात्रय घुले यांनी कंपनीची माहिती देवून कंपनीने दुष्काळी गारवाड येथे शुध्द पाण्याचा प्लॅंट , सोलर लॅंप , हिवाळ्यात ब्लॅंकेट व संसार उपयोगी भांडी आदींचे वाटप केले आहे . कंपनीत काम करणाऱ्या महिलांचा भविष्य निर्वाहनिधी व विमा सुरक्षा कवच देणारी ही एकमेव संस्था असल्याचे ते म्हणाले .
Reactions

Post a Comment

0 Comments