अकलूज येथे महर्षि करंडक ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

अकलूज दि.२१(क.वृ.):शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शंकरराव मोहिते महाविद्यालयाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या महर्षि करंडक शालेय व खुल्या राष्ट्रीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील यांनी दिली.
मोहिते- पाटील म्हणाले, महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, मराठी, हिंदी व इंग्रजी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी कोरोनामुळे या स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने होणार असून ही स्पर्धा शालेय व खुल्या गटामध्ये आयोजित करण्यात आली असून मराठी भाषेमध्ये सादरीकरण करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी आपले व्हिडीओ 26 ऑगस्ट 2020 पर्यंत 9422028838 या क्रमांकावर पाठवावेत.
शालेय गटासाठी कोरोना : मी व माझे कुटुंब, सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील, ऑफलाईन शाळा व ऑनलाईन शिक्षण, माझा आवडता राष्ट्रपुरूष, माझ्या कल्पनेतील माझा भारत तर खुल्या गटासाठी माणसातील देव : माणसं, डॉक्टर, पोलीस, नर्सेस, कोरोना भारत आणि जागतीक संबंध, शेती, शेतकरी आणि शाश्वत फक्त शेतीच, अपने अपने राम.., या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे, संविधानाने आम्हाला काय दिले? व गांधीजी मरत का नाहीत? असे विषय देण्यात आले आहेत. स्पर्धेच्या सादरीकरणासाठी ५ मिनिटे व जास्तीत जास्त 5.30 मिनिटांचा कालावधी देण्यात आला आहे. सदर स्पर्धेच्या शालेय गटासाठी रू.५० तर खुल्या गटासाठी रू. १५० प्रवेश फी ठेवण्यात आली आहे. शालेय गटासाठी प्रथम क्रमांक रू.२०००, द्वितीय क्रमांक रू.१५००, तृतीय क्रमांक रू.१००० तर खुल्या गटासाठी प्रथम क्रमांक रू.3000, द्वितीय क्रमांकासाठी रू.2500, तृतीय क्रमांकासाठी रू.2000 व प्रमाणपत्र अशी पारितोषिकेही देण्यात येणार आहेत. स्पर्धेकरीता डॉ.विश्वनाथ आवड 9422028838, डॉ.सौ अपर्णा कुचेकर 98505 22284, विद्यार्थी समन्वयक मारूती सुर्वे 8600903172, महादेव चव्हाण 7798813195, नागनाथ साळवे 7776062402, समाधान पराडे 8308108131 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन प्राचार्य डॉ.आबासाहेब देशमुख यांनी केले आहे.यावेळी डॉ.विश्वनाथ आवड, डॉ.अपर्णा कुचेकर, प्रा.निवृत्ती लोखंडे, युवराज मालुसरे आदि उपस्थित होते.
0 Comments