विघ्नहर्ता गणरायाचे श्रीगणेशोत्सवावर कोरोनाचे विघ्ने!

मुर्तीकार ,वाद्य पथके, मंडप ,विद्युत प्रकाश, आरास यांच्या व्यवासायावर गडतंर !
हजारो कामगार रोजगार पासुन वंचित !
सार्वजनिक मंडळांना अर्थिक चणचण!
तुळजापूर दि.२१(क.वृ.):- यंदाचा श्री गणेश उत्सव कोरोना चा कहर सुरु असताना येत असल्याने यंदा श्रीगणेशउत्सवात भव्य दिव्य पध्दतीने साजरा करण्यास मर्यादा आल्याने याचा परिणाम गणेशमुर्तीकार तसेच मंडप विद्युत प्रकाश देखावे करणारे व बँड पथक ढोली बाजा डीजे या मोठ्या व्यवसायिकांन सह इतर छोट्या व्यवसायींकाना यंदा मोठा अर्थिक फटका बसणार आहे.
व या व्यवसायात असणाऱ्या हजारो कारागिरांना यंदा रोजगार मिळणार नसल्याने या कारागिरांना रोजगारा अभावी सणासुदीचा काळात अर्थिक संकट ओढवणार आहे.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्रीतुळजाभवानी मातेच्या वास्तव्याने पुनित झालेल्या तिर्थक्षेञ तुळजापूर सह परिसरात श्रीगणेशोत्सव भव्यदिव्य पध्दतीने मोठ्या उत्साहात साजरा केला जातो कारण शारदीयनवराञोत्सव काळात जो तो आपआपल्या कामात व्यस्त असतो,
तिर्थक्षेञ तुळजापूर शहरात श्रीगणेशोत्सव भव्य दिव्य मुर्त्या प्रतिष्ठापना करुन आकर्षक अशी शहरभर विद्युत प्रकाश आकर्षक असे भव्य दिव्य आरास श्रीगणेशोत्वात विघ्नहर्ता गणराया समोर सादर करुन करुन साजरा केला जातो शहरात दहा दिवस आपल्या गणेरायाची मिरवणूक काढली जाते या पार्श्वभूमीवर श्रीगणेश मुर्तीकार मंडप बँडपथक डीजे ढोली पथक आरास व विद्युत लाईटींग करणारे व्यवसायीक यांचा लाखो रुपयाचा व्यवसाय होतो माञ यंदा कोरोना पार्श्वभूमीवर भव्य दिव्यतेने उत्सव साजरा करणे मिरवणूक यांच्या वर शाषणाने निर्बंध आणल्याने विघ्नहर्ता गणरायाचा उत्सव साजरा करण्यावर मोठ्या मर्यादा आल्या आहेत.हे कमी कि काय म्हणून श्रीतुळजाभवानी मंदीर गेली पाच महिन्या पासुन शहरातील दुकाने पुर्णता बंद असल्याने त्यांना वर्गणी मागता येणे अशक्य असल्याने यंदा सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळान अर्थिक चणचण भासत असल्याने यंदा ऐकाही सार्वजनिक मंडळाने श्रीगणेशोत्सव वरील व्यवासायीक मंडळीना अधाप तयारीसाठी बोलवले नाही कारण वर्गणी अधाप जमले नाही यंदा अजून पर्यत ऐकाही मंडळाने श्रीगणेशोत्सव कार्यकारणी जाहीर केली नाही .
मोठे व्यवसायीकांचा व्यवसय ठप्प असल्याने फुले वाले शेतकरी तसेच हार बनवणारे व्यवसायीक यांच्या ही व्यवसायावर मोठा परिणाम होणार आहे.
तसेच तिर्थक्षेञी श्रीगणेशोत्सव मंडळे आपल्या सदस्यांना ड्रेस देतात त्यामुळे टेलरचा व्यवसाय चांगला होतो तोही यंदा संकटात आला आहे.
यंदा ज्या सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळाचे मंदीरे आहेत व त्यांचा मंदीरातील दानपेटीत पडलेला दानातुनच गणेश साजारा होण्याची शक्यता आहे.
ऐकदंरीत यंदाचा श्रीगणेशोत्सव वर कोरोना चे विघ्ने असल्याने साधैपणानै साजरा होण्याचे संकेत मिळत आहेत
यामुळे ठेकेदार शाषकिय अधिकारी यांना वर्गणी मागण्यास कुणीही येणार नसल्यामुळे यांना व सुरक्षा यंञणेवरचा ञास वाचणार असल्याने पोलिस खाते यांना दिलासा मिळणार आहे,
माञ युवकांचा उत्साहावर यंदा पाणी पडणार आहे.
0 Comments