महापौरांच्या हस्ते विणकरांचा सन्मान
राष्ट्रीय हातमाग दिन साजरा
सोलापूर -राष्ट्रीय हातमाग दिनाचे औचित्य साधून
सोलापूर दि.७(क.वृ.): आज शुक्रवारी सकाळी विणकरांचा सन्मान सोलापूरचे महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
विडी घरकुल येथील शिंदे शाळेच्या शेजारी असलेल्या हातमाग व्यवसायिक काशिनाथ दासरी यांच्या कारखान्यातील हातमाग कामगारांना शुभेच्छा देऊन सन्मानित करण्यात आले आहे.यावेळी हातमाग व्यवसायिक काशिनाथ दासरी, हातमाग कामगार राजय्या बुधारम, रामुलू द्यावरकोंडा, कनकय्या गजेली, नागनाथ पगडीमल, बसप्पा मुळे, व्यंकटेश गंगीशेट्टी, सावित्रा गजेली, अंबादास बंडा तसेच गीता नगर येथील हातमाग व्यवसायिक राजेशम सादुल,मलम्मा सादुल यांचा महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते शाल व पुष्पहार घालून सन्मानित करण्यात आले आहे.यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोक इंदापूरे, रमेश यन्नम, गौरीशंकर कोंडा, विनित दासरी, हरिनिवास बिल्ला, गणेश बिराजदार आदी उपस्थित होते.
0 Comments