Hot Posts

6/recent/ticker-posts

श्रीतुळजाभवानी संस्थानचा कारभार नव्या कारभाऱ्यांच्या हाती !

 श्रीतुळजाभवानी संस्थानचा कारभार नव्या कारभाऱ्यांच्या हाती !


तुळजापूर दि.२५(क.वृ.):- श्रीतुळजाभवानी मंदीरसंस्थान पदसिध्द अध्यक्ष तथा जिल्हाधाकारी दीपा मुधोळ मुंढे यांची बदली झाल्यानै  त्यांच्या जागेवर  कौस्तुभ दिवेगावकर  भुजल सर्वेक्षण विकास यंञणा पुणे  संचालक यांची नियुक्ती करण्यात आल्याने त्यांच्या हाती श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थान चा कारभार आल्याने ते श्रीतुळजाभवानी मंदीर भाविकांन साठी कधी खुले करणार या भूमिके कडे लाखौ भाविकांन सहशहरवासियांचा नजरा लागल्या आहेत.
तसेच श्रीतुळजाभवानी  संस्थान चा कारभार कशा पध्दतीने पाहतात याची उत्सुकता भाविक पुजारी व शहरवासियांना लागला आहे, श्रीतुळजाभवानीमंदीरसंस्थानअध्यक्ष पद  कामाचे व मानाचे प्रतिष्ठेचे मानले आहे .श्रीतुळजाभवानी मंदीराचे सर्वासर्व हे जिल्हाधिकारी असतात त्यांच्या निर्णय येथे अंतिम असतो. या पुर्वी तात्कालीन जिल्हाधिकारी प्रविण गेडाम व कै बनसोड यांचाकार्यकाल श्रीतुळजाभवानी मंदीर व तिर्थक्षेञ तुळजापूर चा विकासासाठी महत्त्वाचा ठरला .
श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थानचे पदसिध्द अध्यक्षपद मिळत असल्याने  येथे प्रचंड काम करावे लागते. नुतन जिल्हाधिकारी यांच्या पुढे प्रथम आवाहन श्रीतुळजाभवानी मंदीर भाविकांना  खुले करुन त्यांच्या आरोग्याची काळजी घेतदेवीदर्शन घडविणे हे आहे त्यानंतर श्रीतुळजाभवानी मातेचा शारदीयनवराञोत्सव निर्विघ्नपणे पार पाडणे   हे दुसरे महत्त्वाचे आवाहन असणार आहे, श्रीतुळजाभवानी मंदीर भक्तांन साठी खुले नसल्याने तिर्थक्षेञ तुळजापूर चे अर्थकृरण ठप्प झाले आहे त्यामुळे श्रीतुळजाभवानी मंदीर भक्तांन साठी खुले केले तरच तिर्थक्षेञ तुळजापूर चे अर्थचक्र सुरु होणार असणार असल्याने नुतन जिल्हाधिकारी दिवेगावकर या बाबतीत काय भूमिका घेतात याकडे भाविकांन सह शहरवासिय व्यापारी पुजारी वृंदांचे लक्ष लागले आहे.
त्यानंतर भाविकांना सुलभ दर्शन घडविणे तुळजापूर विकास प्राधिकरणांतर्गत रखडलेले विकास कामे मार्गी लावणे हे ही आवाहन असणार आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments