Hot Posts

6/recent/ticker-posts

कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये शेतमाल नेण्यासाठी रस्ता खुला करा - स्वाभीमानी शेतकरी संघटना

कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये शेतमाल नेण्यासाठी रस्ता खुला करा - स्वाभीमानी शेतकरी संघटना


तुळजापूर दि.२५(क.वृ.):- येथील कृषी उत्पन्न बाजारसमिती समोरून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वरील दुभाजक हटवून कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये शेतमाल वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी रस्ता खुला करण्याची मागणी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या कडे प्रत्यक्ष निवेदन केले. यावेळी सदरील रस्त्याची तातडीने पाहणी करुन शेतमाल साठी रस्ता करुन देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

भारतीय राज्य प्राधिकरण मार्फत राष्ट्रीयमहामार्ग क्रमांक ३६१ रस्त्याचे चौपदरीकर काम केले असुन सदर महामार्गावर कृषी उत्पन्न बाजारसमिती तुळजापूरचे प्रवेश द्वारासमोर रस्ता दुभाजक तयार केल्याने शेतकऱ्यांना शेतमाल कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये विक्रीसाठी आणण्यास अडथळा होत आहे शेतकऱ्यांची गैरसोय लक्षात घेता कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या प्रवेश द्वारासमोरील रस्ता बांधकाम हटवून बाजार समिती त शेतमाल येण्या-जाण्यासाठी रस्ता खुला करुन देण्याच्या मागणी चे निवेदन स्वाभीमानीशेतकरीसंघटना जिल्हाअध्यक्ष रविंद्र इंगळे उपाध्यक्ष धनाजी पेंदे, शांताराम पेंदे, संजय भोसले, अभिषेक कोरे यांनी दिले.
Reactions

Post a Comment

0 Comments