माढा रोटरीच्या वतीने विठ्ठलवाडीत आर्सेनिक अल्बम-30 गोळ्यांचे वाटप

गावातील कोरोना योद्ध्यांना प्रमाणपत्र देऊन केले सन्मानित
माढा (राजेंद्र गुंड)दि.२४(क.वृ.):- माढा रोटरी क्लबच्या वतीने विठ्ठलवाडीतील 300 कुटुंबियांना रोग प्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून आर्सेनिक अल्बम-30 गोळ्यांचे व पर्यावरण संवर्धनासाठी 15 वृक्षांचे रोटरीचे प्रांतपाल डॉ.सुभाष पाटील व अध्यक्ष प्रा.अशोक लोंढे यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विठ्ठलवाडीचे सरपंच प्रा.अरुण कदम होते.
प्रास्ताविकात रोटरीचे अध्यक्ष प्रा.अशोक लोंढे यांनी रोटरीच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
याप्रसंगी विठ्ठलवाडी गाव आजतागायत 'कोरोनामुक्त' ठेवण्यासाठी प्रयत्न करणारे ग्रामसेवक हनुमंत कदम,पोलीस पाटील बालाजी शेगर,आरोग्यसेवक कुतुब सय्यद,शोभा कदम,आशा वर्कर माधुरी गव्हाणे,अंगणवाडी सेविका वैशाली शेंडगे,इंदुमती कदम,मदतनीस वनिता सस्ते,कर्मचारी जयराम भिसे यांना रोटरी क्लबच्या वतीने 'कोरोना योद्धा' प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी "कोरोना से डरोना" या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ.सोमेश्वर टोंगळे म्हणाले की,सध्याच्या भयंकर कोरोनाच्या परिस्थितीत आरोग्य हीच खरी संपत्ती समजून प्रत्येकाने प्रतिकारशक्ती वाढविणे आवश्यक आहे याकरिता सर्व प्रकाराची वाईट व्यसने वर्ज्य करावीत,कोरोनाची मनात भिती न बाळगता योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करीत आर्सेनिक अल्बम-30 या होमिओपॅथिक टॅब्लेटचे सेवन करताना कोणती काळजी घ्यावी याविषयी बहुमोल मार्गदर्शन केले.
यावेळी आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड, उपसरपंच अनिलकुमार बरकडे, सरपंच अरुण कदम यांनी माढा रोटरी क्लबच्या विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे कौतुक करुन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमासाठी रोटरीचे प्रांतपाल डॉ.सुभाष पाटील,चेअरमन अनिलकुमार अनभुले, उपशिक्षणाधिकारी नितेश कदम,माजी अध्यक्ष दिनेश जगदाळे,नागेशजी देशमुख,उपसरपंच अनिलकुमार बरकडे,वाचनालयाचे अध्यक्ष रामचंद्र भांगे,आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड,हनुमंत पाटील,दिपक गव्हाणे,धर्मा उमाटे, सोसायटीचे उपाध्यक्ष बाळू गुंड, प्रगतशील शेतकरी अशोक गव्हाणे,नेताजी उबाळे,सुशेन भांगे,तुकाराम मस्केधनाजी सस्ते, कैलास खैरे,दिनेश कदम,रामदास जाधव,शिवाजी शेगर,विठ्ठल बरकडे,रामलिंग सस्ते,भिमराव नागटिळक,रोहीदास शिंगाडे,दिपक भांगे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.सुभाष पाटील यांनी केले.आभार रोटरीचे सचिव किरण चव्हाण यांनी मानले.
0 Comments