विठ्ठलवाडी ग्रामपंचायतीकडून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेस 2 स्मार्ट टीव्ही भेट

माढा दि.१८(क.वृ.):- माढा तालुक्यातील विठ्ठलवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने शासनाच्या 14 व्या वित्त आयोगातून 43 इंची 2 स्मार्ट टीव्ही सरपंच अरुण कदम यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुभाष लोखंडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
ग्रामीण भागातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक बदल व नवनवीन तंत्रज्ञान समजण्यासाठी भौतिक सुविधांचा अध्यापन प्रक्रियेत दृकश्राव्य माध्यमांचा वापर प्रभावीपणे शिक्षकांना करता यावा या उद्देशाने ग्रामपंचायतीकडून हे टिव्ही संच भेट दिल्याचे सरपंच अरुण कदम यांनी सांगितले.
याप्रसंगी सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड,ग्रामसेवक हनुमंत कदम,पोलीस पाटील बालाजी शेगर,हनुमंत पाटील,मेजर बालाजी कदम,शाळा व्यवस्थापनचे अध्यक्ष दिपक गव्हाणे,उपाध्यक्ष सत्यवान शिंगाडे,आरोग्यसेवक किशोर गुंड, कृषी सहायक दयानंद शेंडगे, अंकुश गवळी, विजय काळे, भारत कदम, गोरखनाथ शेगर,सुप्रिया ताकभाते, वैजिनाथ जाधव यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
0 Comments