शिवसेना मिञ परिवारच्या वतीने राबविण्यात आलेल्या शिवसप्ताहाचा हंगरगा(तुळ)येथे सांगता
तुळजापूर दि.२७(क.वृ.):- शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे तसेच धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार मा.श्री ओमप्रकाश(दादा)राजेनिंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना जिल्हाप्रमुख तथा धाराशिव कळंबचे आमदार कैलास दादा पाटील यांच्या आदेशानुसार दिनांक १७ ते २७ जुलै या कालावधीतआयोजिण केलेल्या अकरा दिवसीय शिवसप्ताहाचा सांगता हंगरगा येथील दुर्लक्षित बहुरुपी वस्तीतील लोकांना चादरी वाटप करण्यात करण्यात आल्या, शिवसप्ताहात शहरासह,तालुक्यात विविध गावात सामाजिक उपक्रम घेतले.तसेच आज शेवटच्या मुख्यमंत्री उध्दवठाकरे यांच्या वाढदिवसादिनी हंगरगा तुळ येथे बहुरूपी वस्तीतील नागरिकांना चादर वाटप करण्यात आले. या ११दिवशीय सप्ताहात,तुळजापूर तहसील येथे आसान व्यवस्था केले,तुळजापूर पोलीस स्टेशन,नळदुर्ग पोलीस स्टेशन, तामलवाडी येथील महाराष्ट्र बॅंक, सलगरा,काटगाव येथील उपकेंद्र येथे सॅनिटायझर स्टॅंड दिले,तुळजापूर येथील काॅरटाईन केलेल्या नागरिकांना अन्नदान करण्यात आले,आपसिंगा व काक्रंबा येथे वृक्षारोपण एच.एस.सी उत्तीर्ण विद्यार्थीचा सत्कार केला,काक्रंबा येथे भाजी मार्केट येथे कापडी पिशवी वाटप केले,येवती येथील शेतकर्याना शेती औवजारे दिले,तुळजापूर नगरपालिकेतील सफाई कर्मचारी यांचा सत्कार सोहळा केला. वडगाव(लाख) येथे पाण्याचे हौद दिले,नंदगाव येथे आर्सेनिक अल्बम व मास्क वाटप करण्यात आले,चादर वाटप करण्यात आले.तसेच या सांगताच्या शेवटच्या दिवशी अर्जुन(आप्पा)साळुंखे यांनी बोलताना शिवसप्ताहाच्या माध्यमातून तुळजापूर तालुक्यातील सर्वसामान्य शेवटच्या घटकांना मदत पोहचवण्यासाठी शिवसेना मिञ परिवाराच्या वतिने सर्वसामान्य जनतेला डोळ्यासमोर ठेवून हे कार्यक्रम घेण्यात आले तसेच भविष्यात ही असेच तुळजापूर तालुक्यात राबविण्यात येतील असे उद्गार काढले.तसेच हा शिवसप्ताह प्रामाणिकपणे यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी जे अथक परिश्रम घेऊन कार्य करणार्या शिवसैनिकांचे मनापासून *रोहित नागनाथराव चव्हाण* यांनी मानले आभार. आजच्या कार्यक्रमावेळी शिवसेना काक्रंबा गणप्रमुख कालीदास सुरवसे,सो.मि.ता.प्रमुख चेतन बंडगर शिवसेना शाखाप्रमुख शंकर(बाँस)गव्हाणे,बालाजी पांचाळ,सिंदफळ सोशल मीडिया विभागप्रमुख सिद्राम कारभारी,प्रविण क्षीरसागर, तानाजी विभुते तसेच गावकरी उपस्थित होते.
0 Comments