आपसिंगा ग्रामपंचायत सदस्य अमीर शेख यांच्या वतीनै अर्सिनिक गोळ्या वाटप
तुळजापूर दि.२७(क.वृ.): शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे साहेब व लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त युवा सेना तालुका प्रमुख प्रतिक रोचकरी व आपसिंगा ग्रामपंचायत सदस्य अमीर शेख यांच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती येथील कामगारास अर्सनिक अल्बम ३० व मास्क आणि सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले.यावेळी शहर प्रमुख सुधीर कदम बाळासाहेब शिंदे बापू नाईकवाडी सागर इंगळे युवासेना प्रदीप इंगळे विकास भोसले किशोर पवार रवी ज्योत ऋषी इंगळे विक्रम नाईकवाडी स्वरूप कांबळे यांच्यासह शहरातील सर्व शिवसैनिक व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments