सांगोला विद्यामंदिर प्रशालेचे एस.एस.सी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश ९०% पेक्षा अधिक गुण मिळविणारे ९२ विद्यार्थी
![]() |
मनीष मनोज उकळे ९८.४० % प्रथम क्रमांक |
![]() |
सुमित राजेंद्र सुर्यवंशी ९७.६०% द्वितीय क्रमांक |
सांगोला दि.२९(क.वृ.): मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी.बोर्ड परीक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीने दि.२९ जुलै रोजी जाहीर करण्यात आला. सदर परीक्षेत सांगोला विद्यामंदिर प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी गुणवत्तेची परंपरा कायम राखत दैदिप्यमान यश प्राप्त केले आहे. प्रशालेचा निकाल ९९.८०% लागला असून या निकालाबद्दल सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले.
सांगोला विद्यामंदिर प्रशालेमधून ५०९ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते त्यापैकी ५०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून कुमार मनीष मनोज उकळे - ९८.४० % प्रथम,कुमार सुमित राजेंद्र सुर्यवंशी - ९७.६० % द्वितीय तर कुमारी मधुराणी दत्तात्रय माळी व कुमार संकेत संतोषकुमार निंबाळकर- ९७.४०% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला आहे.तसेच यावर्षीच्या निकालातील उल्लेखनीय बाब म्हणजे प्रशालेतील ९२ विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा अधिक गुण संपादन केलेले आहेत.
वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, संस्थासचिव म.शं.घोंगडे, संस्था सहसचिव प्रशुध्दचंद्र झपके, सर्व संस्था सदस्य, मुख्याध्यापक पोपट चवरे, सर्व प्रशासकीय अधिकारी, प्रशाला व ज्युनिअर कॉलेज मधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
0 Comments