Hot Posts

6/recent/ticker-posts

माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती; 15 ऑक्टोबर 2020 पर्यंत अर्ज करण्याची मुदत

माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती;

15 ऑक्टोबर 2020 पर्यंत अर्ज करण्याची मुदत



सोलापूर,दि.२९(क.वृ.): जिल्ह्यातील माजी सैनिकयुद्ध विधवामाजी सैनिक विधवा यांच्या पाल्यांसाठी असलेल्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची मुदत 15 ऑक्टोबर 2020 पर्यंत असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.  
माजी सैनिकांचे पाल्य 10 वी12 वीपदविका आणि पदवी अभ्यासक्रमात सन 2019-20 या शैक्षणिक वर्षात 60 टक्क्यांपेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण होऊन पुढील वर्गात प्रवेश घेणाऱ्यांनी कागदपत्रासह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयसोलापूर यांच्याकडे अर्ज करावेत.
शिष्यवृत्तीसाठी लागणारी कागदपत्रे
1. वैयक्तिक अर्ज
2. शिष्यवृत्तीचा विहित नमुन्यातील अर्ज
3. गुणपत्रिकाची साक्षांकित प्रत
4. इतर कोणतीही शिष्यवृत्ती मिळत नसल्याचा शाळा/महाविद्यालय प्रमुखाचा दाखला.
5.शिष्यवृत्तीधारक मुलगी 12 वीच्या पुढे शिकत असल्यास अथवा 18 वर्षापेक्षा जास्त वय असल्यास अविवाहित असल्याचा ग्रामपंचायतीचा दाखला.
6. माजी सैनिक/विधवा यांच्या ओळखपत्राची प्रत
7. डिसचार्ज बुकची सत्य प्रत. यात पाल्याचे नाव नसल्यास रेकॉर्ड कार्यालयातील डीओ-2 ऑर्डर प्रत.
ज्या पाल्यांनी सीईटी/जेईई किंवा इतर कारणासाठी गॅप घेऊन पुढील वर्षासाठी प्रवेश घेतलेला आहेअशा पाल्यांनी माजी सैनिकांचे गॅप सर्टिफिकेट (स्वयंघोषणापत्र) जोडून शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करावेत.
Reactions

Post a Comment

0 Comments