Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रधानमंत्री आवास योजनेतील कुटुंबांनी आधार सिडींग करुन घेण्याचे आवाहन

प्रधानमंत्री आवास योजनेतील कुटुंबांनीआधार सिडींग करुन घेण्याचे आवाहन



सोलापूर,दि.२९(क.वृ.): प्रधानमंत्री आवास योजनेत सर्वेक्षण झालेल्या कुटुंबानी पंधरा वर्षावरील सदस्यांच्या आधार सिडींगचे काम पूर्ण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी केले आहे. 
याबाबत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनिलकुमार नवाळे यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात नमूद करण्यात आले आहे की, प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रपत्र-ड यादीत समावेश असलेल्या कुटुंबांचे आवास प्लस ॲपद्वारे सर्व्हेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. या प्रक्रियेतील आधार सिडींगचे काम गावपातळीवर सुरु आहे. तरी संबंधितांनी सरपंच, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक यांच्याशी तातडीने संपर्क साधून कुटुंबातील पंधरा वर्षावरील सदस्यांची आधार सिडींगचे काम पूर्ण करुन घ्यावे. आधार सिडींग 31 जुलै 2020 पर्यंत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Reactions

Post a Comment

0 Comments