अकलूज(प्रतिनिधी) ग्रामस्तरिय समिती सभेत अकलूज येथील कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या व त्यातून होत असलेल्या संक्रमण साखळी रोखण्यासाठी अकलूज मधील सर्व व्यापारी व सामाजिक संघटना आणि नागरिकांच्या विनंती वरून घेतलेल्या निर्णयानुसार दिनांक २३ जुलै२०२० (गुरुवार)पासून दिनांक २५ जुलै२०२०(शनिवार)पर्यंत अकलूज संचारबंदीची (lock down)घोषणा. केली असल्याची माहिती ग्रामस्तरीय समिती अध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी दिली.
या काळात फक्त औषध दुकाने व दुध व्यवसाय सुरु राहतील.इतर कोणतेही व्यवसाय सुरु राहणार नाहीत.अत्यावश्यक कारणास्तव बाहेर जाणे करता नोडल ऑफिसर नितीन चव्हाण(९८८१५६३१७८)संपर्क साधावा. त्याशिवाय घराबाहेर कुणी आढळल्यास कडक कारवाई केली जाईल.इतर काही अडीअडचणी करता अकलूज ग्रामपंचायत कम्युनिकेशन सेंटर, रोहित शेटे(९७६३८७४७३७)येथे संपर्क साधावा.
सदर संचारबंदी कोरोना संक्रमण साखळी रोखण्यासाठी असल्याने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करा अन्यथा संचारबंदी नियमानुसार कारवाई होऊ शकते. सहकार्य करा.कोरोना संक्रमण रोखा.. सतर्क रहा.घरा बाहेर पडू नका.असे शिवतेजसिंह मोहिते-पाटील म्हणाले.
0 Comments