तिर्थक्षेञ प्रथमच थांबले !शंभर टक्के बंद !रस्ते सुनसान !
तुळजापूर - तिर्थक्षेञ तुळजापूरात कोरोना रोखण्यासाठी नगरपरिषद ने बुधवार दि22ते26 या कालावधीत पुकारलेल्या जनता कर्फ्युचा पहिल्या दिवसास नागरिकांनी घरातच थांबुन स्वयंस्फुर्तने प्रतिसाद दिला.
तिर्थक्षेञ तुळजापूर आज शंभर टक्के बंद होते ऐरव्ही गर्दी ने गजबजुन जाणारा मंगळवार पेठ जुने बसस्थानक चौक येथे शुकशुकाट होता तसेच बँकान मुळे सर्वाधिक गर्दी होणाऱ्या नळदुर्ग रस्त्यावर बँकानी जनता कर्फ्यु त सहभागनोंदवल्याने येथेही शुकशुकाट जाणवत होता.
सकाळी सहा ते नऊ कालावधीत पेपर वितरण करणारे दुध वितरण करणाऱ्या मंडळी व्यतिरिक्त कुणाही रस्त्यावर दिसुन आले नाही नउ नंतर माञ मुख्य रस्ते गल्लीबोळांन मध्ये शुकशुकाट दिसुन आला आज फिरायला येणारे मंडळी ही फिरण्यास बाहेर पडले नाहीत.
शहरातील अत्यावश्यक सेवा देणारे मेडीकल दुकाने वगळता ऐक ही दुकान आज उघडले नव्हते .
आज शहरातील ऐकृही नागरिक घराबाहेर पडला नाही व तालुक्यातुन ऐक व्यक्ती तुळजापूरात न आल्याने शहरभर सर्वञ शुकशुकाट जाणवत होता .
जनता कर्फ्यु पार्श्वभूमीवर शाषाकिय कार्यालय सुरु होते माञ कामासाठी ऐकही व्यक्ती न आल्याने कार्यालयात ही शुकशुकाट दिसुन आला.
आज शहरातील पंधरा बँका व भाजीपाला विक्री दुकाने कृषी दुकाने पेट्रोल पंप ही पुर्णपणे बंद होते .
बाहेर गावाहुन आलेले रुग्ण व पोलिसांना माञ आज गैरसोयीस सामोरे जावे लागले .
पन्नास रुग्णांना मोफत रिक्षा सेवा
जनता कर्फ्यु पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकते आनंद कंदले व आनंद दादा मिञ मंडळाचा वतीने पाच दिवस रुग्णांना दवाखाना ते घर अशी रुग्ण सेवा मोफत सुरु केली होती त्याचा पहिला दिवशी पन्नास रुग्णांनीषलाभ घेतला यासाठी तीन रिक्षेतैनात ठेवले होते.
0 Comments