अकलूज(प्रतिनिधी) रामायण चौक, अकलूज येथे कामावरती असणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यास कंटेनमेंट झोनमध्ये भाजी विक्रीच्या कारणावरून भाजी विक्रेता व त्याच्या मुलाने जबर मारहाण केली आहे. याबाबत ग्रामपंचायत कामगार गोविंद राजू साळवी याने अकलूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
गोविंद साळवी हा अकलूज ग्रामपंचायतीकडे कंत्राटी कामगार म्हणून काम करीत आहे. रामायण चौक येथे कोरोना पॉझेटीव्ह रूग्ण सापडल्यामुळे तेथे कंटेनमेंट झोन घोषित करून करून बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सकाळी ७ च्या सुमारास भाजी विक्रेता शिवाजी
कृष्णा चव्हाण (रा. अकलूज) हा आपली पॅजो (एमएच ४५ एई०१६९) गाडी घेऊन तेथे भाजी विक्रीसाठी आला व कंटेमेंट झोनमध्ये जाण्याचा प्रयत्न करू लागला. त्यास गोविंद साळवी याने मनाई करताच त्याने त्याचा मुलगा कुणाल चव्हाण यास बोलावून घेतले व दोघांनी मिळून शिवगाळ करत गोविंद यास हात पिरगाळून मारहाण केली.
या घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायत कर्मचारी शिवरत्न लोंढे व खलील शेख हे तातडीने तेथे आले व भांडण सोडवून गोविंद यास पोलीस ठाण्यात घेऊन गेले. तेथून गोविंद यास उपचाराकरीता दवाखान्यात नेण्यात आले. भाजी विक्रेत्यास व त्याच्या मुलास पोलीसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोहेकॉ. संतोष मोरे करत आहेत.
0 Comments