Hot Posts

6/recent/ticker-posts

मार्कंडेय, गंगामाई, वळसंगकर हॉस्पिटलला जिल्हाधिकारी, आयुक्तांच्या भेटी कोरोना रूग्णांच्या व्यवस्थेची जिल्हा समितीने केली पाहणी

मार्कंडेयगंगामाईवळसंगकर हॉस्पिटलला जिल्हाधिकारी
आयुक्तांच्या  भेटी कोरोना रूग्णांच्या व्यवस्थेची जिल्हा 
समितीने केली पाहणी
  

         
             
    
                       सोलापूर,दि.22: सोलापूर शहरामध्ये कोरोना रूग्णांसाठी खाजगी दवाखाने अधिग्रहित केले असून 80 टक्के बेड कोविड रूग्णांच्या उपचारासाठी ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याची अंमलबजावणी व्यवस्थित होते की नाही यासाठी आज जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकरमहापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी शहरातील मार्कंडेय सोलापूर सहकारी रूग्णालय आणि संशोधन केंद्रगंगामाई हॉस्पिटल आणि वळसंगकर हॉस्पिटलला भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली.
          यावेळी समितीमधील सदस्य डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूरश्री छत्रपती सर्वोपचार रूग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेलेआयएमएचे डॉ. हरिष रायचूर उपस्थित होते.
          मार्कंडेय रूग्णालयात 105 बेड कोविड रूग्णांसाठी ठेवले असून 116 पर्यंत रूग्णांची सोय होत असल्याचे चेअरमन डॉ. माणिक गुर्रम यांनी सांगितले. यावेळी श्री. शंभरकर आणि श्री. शिवशंकर यांनी रूग्णालयांच्या अडचणी जाणून घेतल्या. कोविड हॉस्पिटलमध्ये केवळ गंभीर रूग्णांना दाखल करून उपचार कराबाकी पॉझिटिव्ह रूग्णांवर कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी पाठवून देण्याच्या सूचना श्री. शंभकरकर यांनी दिल्या.
          शासनाच्या निर्देशानुसार असलेल्या सोयी-सुविधाव्यवस्थाकोविड वॉर्डऑक्सिजन सुविधासीसीटीव्हीची सुविधा आणि संख्याते व्यवस्थित कार्यान्वित आहेत काआयसोलेशन वॉर्डातील सुविधा कशा आहेतआयसीयुची व्यवस्थानातेवाईकांच्या राहण्याची व्यवस्थापार्किंग व्यवस्थामहात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेतील लाभार्थ्यांच्या सोयी-सुविधामनुष्यबळ याबाबत त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून सूचना केल्या. तसेच केस पेपर आणि इतर नोंदीची माहितीदाखल आणि डिस्चार्ज पॉलिसीरूग्णांसाठी फोनची सुविधाडॅशबोर्डपल्स ऑक्सिमिटर यांचीही माहिती घेऊन सुधारण्या करण्याबाबत सूचना दिल्या.
          श्री. शंभरकर यांनी समुपदेशनासाठी वेगळी जागा उपलब्ध करून द्यागंगामाई हॉस्पिटलमध्ये कोविड रूग्णांसाठी 15 आयसीयु बेडची व्यवस्था आणि आवश्यक रूग्णांना ऑक्सिजनची व्यवस्था करण्याच्या सूचना हॉस्पिटल प्रशासनाला दिल्या. वळसंगकर हॉस्पिटलमध्ये 30 पैकी 10 बेड कोविडसाठी आहेत. याठिकाणी 10 व्हेंटिलेटरची सुविधाही आहे. काही त्रुटी आढळल्या त्याची पुर्तता करण्याचे निर्देश श्री. शंभरकर यांनी दिले असून जिल्ह्यातील इतर ठिकाणीही जिल्हास्तरीय समिती पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
          कोविड-19 रूग्णालयांची नियमित तपासणी व देखरेखीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती नियुक्त केली आहे. यामध्ये सदस्य म्हणून मनपा आयुक्तअधिष्ठाताजनरल मेडिसिनचे विभागप्रमुखजिल्हा सर्व्हेक्षण अधिकारीमनपा आरोग्य अधिकारीइंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्षसदस्य सचिव म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक हे आहेत
Reactions

Post a Comment

0 Comments