शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी प्रयत्नशील- रवींद्र माने कृषी दिनानिमित्त कृषी संजीवनी सप्ताहाचा शुभारंभ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 2, 2020

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी प्रयत्नशील- रवींद्र माने कृषी दिनानिमित्त कृषी संजीवनी सप्ताहाचा शुभारंभ

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी प्रयत्नशील- रवींद्र माने
कृषी दिनानिमित्त कृषी संजीवनी सप्ताहाचा शुभारंभ



सोलापूर, दि.1(क.वृ.): देशातील विकासाचा केंद्रबिंदू शेतकरी आहे. पिकाची उत्पादकता, गुणवत्ता आणि उत्पन्नातील वाढ या त्रिसूत्रीचा वापर करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी प्रयत्नशील असल्याचे कृषी उपसंचालक रवींद्र माने यांनी सांगितले.
आत्मा सभागृहात माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कृषी दिन कार्यक्रमात श्री. माने बोलत होते. कृषी संजीवनी सप्ताहाच्या शुभारंभप्रसंगी विभागीय कोरडवाहू संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. अमृत सागर, आत्माचे प्रकल्प उपसंचालक मदन मुकने, श्री. सदाफुले, कृषी विकास अधिकारी श्री. कांबळे, उपविभागीय कृषी अधिकारी उमेश बिराजदार आदी उपस्थित होते.
श्री. माने यांनी वसंतराव नाईक यांचे कृषी क्षेत्रातील कामाचे महत्व विषद केले. कृषी संजीवनी सप्ताहामध्ये कृषी तंत्रज्ञान परिणामकारक होण्यासाठी प्रचार व जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी केले.
मोहोळ येथील कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ अमोल शास्त्री यांनी खरीप हंगामाबाबत मार्गदर्शन केले तर अमृत सागर यांनी जिल्हा खरीप हंगामामध्ये समाविष्ट केल्याबद्दल समाधान व्यक्त करून खरीप पिकाच्या शिफारशीबाबत मार्गदर्शन केले.
कृषी विभागाच्या प्रांगणामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये वृक्षारोपण झाले. यावेळी विभागीय कृषी संशोधन केंद्राचे डॉ. मंजुनाथ पाटील, तंत्र अधिकारी श्री. माळी, कृषी अधिकारी श्री. नारायणकर, सचिन चव्हाण आदींसह शेतकरी, कृषी मित्र उपस्थित होते. सूत्रसंचालन अशोक राठोड यांनी केले तर आभार दक्षिण तालुका कृषी अधिकारी श्री. वाघमोडे यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages