Hot Posts

6/recent/ticker-posts

कडलास हायस्कूल कडलास ची एस एस सी बोर्ड परीक्षेत उत्तुंग भरारी

कडलास हायस्कूल कडलास ची एस एस सी बोर्ड परीक्षेत उत्तुंग भरारी

"गुणवंत विद्यार्थ्यांनी संस्थेस दिली सुवर्ण महोत्सवी वर्षाची सुवर्ण भेट"



सेमी प्रथम क्रमांक--ऋतुजा दिपक गायकवाड
सेमी द्वितीय क्रमांक--यशोदिप सुनिल पवार
सेमी तृतीय क्रमांक--ऋतुजा दिगंबर नागणे
सांगोला (मोहन शिंदे)  मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी.बोर्ड परीक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीने काल २९ जुलै रोजी जाहीर करण्यात आला. सदर परीक्षेत श्री छत्रपती शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कडलास हायस्कूल कडलासच्या विद्यार्थ्यांनी गुणवत्तेची परंपरा कायम राखत  दैदिप्यमान यश प्राप्त केले आहे. प्रशालेचा सेमी आणि मराठी अशा दोन्ही माध्यमाचा निकाल  १००% लागला असून या निकालाबद्दल  श्री छत्रपती शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले.

 कडलास हायस्कूल कडलास चे एकूण ६४ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते त्यापैकी सर्वच्या सर्व (६४)  विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, कडलास हायस्कूल कडलास चे पहिले तेरा क्रमांक केंद्रात आले असून सदर तेरा गुणवंत विद्यार्थ्यांना 90 % हुन अधिक गुण मिळाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांनी संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाची सुवर्ण भेट दिली असल्याची भावना अनेक पालकांनी आणि शिक्षकांनी व्यक्त केली. सेमी माध्यमातील यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे--; 
प्रथम क्रमांक :- कु. ऋतुजा दिपक गायकवाड 94.60%


द्वितीय क्रमांक:- यशोदीप सुनिल पवार 93.60%


तृतीय क्रमांक :- कु.ऋतुजा दिगंबर नागणे 92.60%


मराठी माध्यम प्रथम क्रमांक--प्राप्ती अशोक गायकवाड
मराठी माध्यम द्वितीय क्रमांक---ऐश्वर्या नागेश गायकवाड
मराठी माध्यम तृतीय क्रमांक--प्रतिभा पोपट केदार

मराठी माध्यमाचा निकाल 100% लागला असून मराठी माध्यमातील गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे ;-  

प्रथम क्रमांक:-कु. प्राप्ती अशोक गायकवाड 83%


द्वितीय क्रमांक :-कु. ऐश्वर्या नागेश गायकवाड 82%

तृतीय क्रमांक:-कु. प्रतिभा पोपट केदार 80.80%


यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष प्रकाश पाटील,संस्था सचिव विजयसिंह पाटील,माजी चेअरमन सुनिल पाटील,माजी चेअरमन रामदास माने,संस्था सदस्य हणमंत पाटील,संस्था सदस्य शरद मोरे,संस्था सदस्य जगन्नाथ गायकवाड ,मुख्याध्यापक शहाजी गायकवाड,सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
Reactions

Post a Comment

0 Comments