शासकीय माध्यमिक आश्रम शाळेचा निकाल शंभर टक्के - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 30, 2020

शासकीय माध्यमिक आश्रम शाळेचा निकाल शंभर टक्के

शासकीय माध्यमिक आश्रम शाळेचा निकाल शंभर टक्के



सोलापूर दि.३०(क.वृ.): महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ- पुणे यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेचा निकाल शंभर टक्के लागला असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक श्री. बी.जी. वाघमारे यांनी दिली.पहिल्या तीनही क्रमांकामध्ये यंदा मुलींनीच घवघवीत यश संपादन केल्याचे ते म्हणाले. रेणुका गुंडाप्पा कांबळे या विद्यार्थिनीने ९०•४०% गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक येण्याचा मान मिळविला तर रूपाली अंबंना सोनकडे हिने 87•40% टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला तसेच निकिता सिद्राम बंदीछोडे या विद्यार्थिनीने ८०•८०% गुण मिळवून प्रशालेत तृतीय क्रमांक मिळविला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन शाळेचे मुख्याध्यापक बि. जी. वाघमारे यांच्यासह पालक व शिक्षक वृंद यांनी केले. या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी डी. व्ही. रोकडे, डी.जे. अनारसे, एस.एम. गुजर, एस एल.कोळी आदी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages