रोटरी क्लब, टेंभुर्णी यांचे वतीने 'कोविड वारियर' प्रमाणपत्र प्रदान
टेंभुर्णी(क.वृ.): रोटरी क्लब,टेंभुर्णी यांचे वतीने गेल्या 3 महिन्यात करोना या साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर आपल्या जीवाची पर्वा न करता जनते ला सेवा करणारे पोलीस,सरकारी दवाखान्यातील डॉक्टर व सर्व स्टाप व ग्रामपंचायत मधील सर्व कर्मचाऱ्यांना 'करोना वारीयर 'प्रमाणपत्र देऊन त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली .यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे डॉ.अमोल माने -शेंडगे व सर्व सहकारी स्टाप व ग्रामपंचायत येथे ग्रामविकास अधिकारी मधुकर माने व स्टाप तसेच टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे व स्टाप यांना कोरोना वरियर हे रोटरी तर्फ प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले यांना रोटरी क्लब टेंभुर्णी चे नूतन अध्यक्ष शब्बीरशेठ जहागीरदार, नूतन सचिव उमेश रावळ व सर्व रोटरी क्लब चे सदस्य उपस्थित होते
0 Comments