जय श्रीराम लिहून शरद पवारांना हजारो पत्रे पाठवणार - चेतनसिंह केदार-सावंत
सांगोला दि.२४(क.वृ.) : अयोध्येत राममंदिर बांधून कोरोना जाणार नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केली होती. या टीकेला प्रत्युत्तर म्हणून भाजप जनता पार्टीचे सांगोला तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातून जय श्रीराम लिहिलेली हजारो पत्रे शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी पाठविली जाणार आहेत.
सोलापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राम मंदिर बांधल्याने कोरोना जाणार आहे का? देशाच्या प्रमुखांनी कशाला प्राधान्य दिलं पाहिजे? असा सवाल केला होता. भारतीय जनता पार्टीने शरद पवारांचं हे विधान खेदजनक असल्याचं सांगत या वक्तव्याचा निषेध केला आहे. माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, जिल्हाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गजानन भाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी सांगोला यांच्यावतीने तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी जय श्रीराम लिहिलेली हजारो पत्रे पाठवून अनोखे आंदोलन करण्यात येणार आहे.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत म्हणाले, येत्या 5 आॅगस्टला अयोध्येत रामजन्मभूमी मंदिराचा शिलान्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असून या निमित्ताने संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण असताना असे कोणी नकारात्मक बोलणार असेल तर प्रभु श्रीरामाची आठवण करून देण्याचे काम भारतीय जनता पार्टी नेहमीच करत राहील. शरद पवारांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी सांगोला तालुक्यातील भाजपचे हजारो कार्यकर्ते आणि नागरिक पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन मोठ्या संख्येने पत्रे जमा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
0 Comments