Hot Posts

6/recent/ticker-posts

लऊळ येथे सोशल डिस्टनसिंग फज्जा,नागरिकांच्या अडहट्टीपणापुढे प्रशासन हतबल.

लऊळ येथे  सोशल डिस्टनसिंग फज्जा,नागरिकांच्या अडहट्टीपणापुढे  प्रशासन हतबल.



      
 लऊळ दि.२४(क.वृ.):- लऊळ ता.माढा श्री संत कूर्मदास महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाल्यामुळे सबंध महाराष्टात ओळखले जाते.तब्बल दहा हजारांच्या आसपास लोकसंख्या असणारे लऊळ गाव सर्व सोयीं सुविधांनी उपयुक्त आहे. संपूर्ण गाव ओलिताखाली असल्याने तसेच गावात लसनापासून ते सोन्यापर्यंतचा व्यापारीवर्ग व नोकरदारांची संख्या जास्त असल्यामुळे गाव आर्थिकदृष्टीने सबळ आहे.गावात दररोज लाखोंची उलाढाल होत असते.गावाला बारा गावंशिवा असल्यामुळे पडसाळी,भुताष्टे,सापटने,कुर्डु, शिराळ, उजनी, व्होळे,घाटणे,पिंपळनेर,चिंचोली आदी गावचा बराचसा व्यवहार लऊळ मधून चालत असल्याने हे गाव आर्थिक केंद्र बनले आहे.त्यामुळे गावात बाहेरून येणाऱ्यांची संख्या जास्त आहे.
सध्या कोरोना महामारीने देशाला मेटाकुटीला आणले असताना लऊळ सारख्या सुशिक्षित असणाऱ्या गावात काही नागरिकांच्या मग्रूर व अडहट्टीपणामुळे सध्या गाव कोरोनाच्या विळख्यात अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने नागरिकांना कामाशिवाय घराबाहेर पडू नका, सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळा, सोशल डिस्टंसिंग राखा असे आदेश जारी केले असताना लऊळ ग्रामस्थांमधून या आदेशाचे अजिबात गांभीर्य नसल्याचे दिसून येते. मास्क व सॅनिटायझरचा वापर कोणताही व्यापारी, दुकानदार  व नागरिक करताना दिसत नाहीत.बँकेच्या बाहेर माणसांची गर्दी सर्रासपणे पहायला मिळते. पारावरच्या गप्पा रंगत असून कोरोनालाआमंत्रण देताना गावकरी दिसतात.कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडण्याचा मार्ग मात्र गावपुढाऱ्यांच्या राजकारणाच्या कलगीतुऱ्यामुळे धुसर झाला आहे.गावात ठराविक अंतरावर माणसांचे थवे असल्याचे चित्र गावच्या प्रत्येक रस्त्यावर दिसते. दोन महिन्यापूर्वी गावामध्ये एका मृत महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता येथूनच माढा तालुक्यात कोरोनाची एंट्री झाली होती. गावचे नशीब बलवत्तर म्हणून आतापर्यंत या कोरोनाचा एकही रुग्ण आढळलं नाही. परंतु गावच्या अगदीच जवळ असलेल्या कुर्डूवाडी,भोसरे याठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळत असताना लऊळकर मात्र आपल्याच रंगात दंग असल्याचे चित्र दिसते. कोरोनासारखे भयानक जागतिक संकट गावच्या दारात उभे असताना गावकरी मात्र प्रशासनाला हुलकावणी देण्यात तरबेज आहेत. नागरिकांच्या या ओडहट्टीपणापुढे प्रशासन मात्र हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे. कोरोना सारख्या जागतिक महामारी सामना करत असताना प्रशासनाला जर नागरिकच प्रतिसाद देत नसतील तर येणारे फार मोठे संकट लऊळ ग्रामस्थ टाळू शकणार नाहीत हे मात्र नक्की.
Reactions

Post a Comment

0 Comments