Hot Posts

6/recent/ticker-posts

देवकतेवाडी (मांजरी)चा "जिगर" नामक बोकड ठरत आहे,पंचक्रोशीत आकर्षण

देवकतेवाडी (मांजरी)चा "जिगर" नामक बोकड ठरत आहे: पंचक्रोशीत आकर्षण


सांगोला दि.२४(क.वृ.):- देवकतेवाडी(मांजरी)  ता--सांगोला येथील प्रगतिशील शेतकरी तानाजी अर्जुन जगताप यांनी पालन पोषण केलेला तब्बल १०४ किलो वजन आणि कपाळावर "चाँद"असणारा "दोन दाती" जिगर नामक बोकड सध्या पंचक्रोशीत आकर्षण आणि चर्चेचा विषय बनला असून देवकतेवाडी पंचक्रोशीत,शेळीपालन, पशुपालन करणारे अनेक पशुपालक येवून जगताप यांनी पालनपोषण केलेल्या जिगर या बोकडाची चौकशी करताना दिसत आहेत.
ग्रामीण भागात एवढा मोठा बोकड छंद म्हणून पालन करणाऱ्या युवा शेतकरी तानाजी जगताप आणि त्यांचे वडील अर्जुन जगताप यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.घरी पालन केलेल्या शेळीचा जिगर नामक बोकड अतिशय पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळला असून त्यास दररोज अर्धा किलो शेंगदाणे,अर्धा किलो गहू,अर्धा किलो शेंगदाणे पेंड,आणि हिरवा चारा असा खुराक दररोज दिला जातो. येणाऱ्या बकरी ईद सणांसाठी जिगर नामक बोकडास वारंवार व्यापाऱ्याकडून मागणी होत असून यापुढील काळात ही आपण कपाळावर चाँद असलेल्या बोकडाचे पालन पोषण करणार असल्याचे तानाजी जगताप आणि अर्जुन जगताप यांनी सांगितले.
दिसायला रुबाबदार,अंगावरचे झुबकेदार केस,कपाळावर चाँद, दोन दात असलेला आणि केवळ सतरा महिन्यांच्या बोकडाला योग्य किंमत आली तरच देणार असल्याचेही जगताप यांनी सांगितले.कोणाला विकत हवा असल्यास 8999090354, 9689471527 यावर संपर्क  साधण्याचे आवाहन ही तानाजी जगताप यांनी केले आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments