Hot Posts

6/recent/ticker-posts

दहावी सीबीएसई बोर्ड परीक्षेत नागेश करजगी ऑर्किड स्कूलच्या विद्यार्थ्यांचा १०० टक्के निकाल!

दहावी सीबीएसई बोर्ड परीक्षेत नागेश करजगी ऑर्किड स्कूलच्या विद्यार्थ्यांचा १०० टक्के निकाल!

हरी ओम माने
९६.०२% (
प्रथम क्रमांक)
झलक छाजेड
९२% (
व्दितीय क्रमांक)














नागेश बधोले
९१.०४% (
तृतीय क्रमांक)

सोलापूर दि.१६(क.वृ.):केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन यांच्यावतीने फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या दहावी बोर्ड परीक्षेचा अंतिम निकाल बुधवारी जाहीर झाला. या परीक्षेत नागेश करजगी ऑर्किड स्कूलचा १०० टक्के निकाल लागला. शाळेतील एकूण २३ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. यात कु. हरीओम माने याने ९६.२ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक, कु. झलक छाजेड याने ९२ टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक व कु. नागेश भडोळे याने ९१.४ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. तसेच १८ विद्यार्थी प्रथम श्रेणी मध्ये उत्तीर्ण झाले.
सर्व विद्यार्थ्यांनी गुणवत्तेत नवा उच्चांक निर्माण करून यंदाच्या वर्षापासून उज्वल यशाची परंपरा सुरू केली. शाळेच्या पहिल्याच बॅचचा १०० टक्के निकाल लागला. संस्थेचे अध्यक्ष कुमार करजगी यांनी २०१२ मध्ये दर्जेदार शिक्षण देणाऱ्या व सीबीएसई अभ्यासक्रम राबवणाऱ्या शाळेची स्थापना केली. सर्व विद्यार्थ्यांवर विविध स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. गुणवंत विद्यार्थ्यांना शाळेतील श्रीकांत जोशी, देवेंद्र निंबर्गीकर, राजेश्वरी शिरकणहळ्ळी, रश्मी कांबळे, असिफा मुल्ला, तेहसीन शेख, परवीन केसरभावी, अमित वाले, आनंद लिगाडे आदी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.  सर्व गुणवंत विद्यार्थी, पालक व शिक्षक यांचे संस्थेचे अध्यक्ष कुमार करजगी व सचिवा वर्षा विभूते यांनी अभिनंदन केले.  
यावेळी विद्यार्थी-पालकांनी फोनद्वारे आपली मनोगते व्यक्त केली. शाळेतमिळत असलेल्या   गुणवत्तापूर्ण शिक्षणाबद्दल गौरवोद्गार काढले. सर्व विद्यार्थ्यांबरोबरच्या संवादावरून त्यांचा आनंद जाणवत होता. 
प्राचार्या रुपाली हजारे यांनीही सर्व यशस्वी विद्यार्थी - पालकांचे फोनद्वारे कौतुक केले. त्याचबरोबर संस्थेच्या ज्युनिअर कॉलेजमधील विविध नाविन्यपूर्ण कोर्सेसची विद्यार्थी-पालकांना माहिती दिली. यावेळी पूर्व प्राथ. विभागाच्या प्राचार्या अनिता अनगोंडा, प्रशासनाधिकारी राजाराम चव्हाण आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments