Hot Posts

6/recent/ticker-posts

सांगोल्यात कोरोना चा धोका वाढला तीन कोरोना पॉझिटिव

सांगोल्यात कोरोना चा धोका वाढला तीन कोरोना पॉझिटिव


सांगोला,दि.१७(क.वृ.): पुजारवाडी सांगोला, ता- सांगोला येथील यापूर्वी पॉझिटिव आलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील निकटतम संपर्कात आलेल्या एकूण सोळा व्यक्तींचे स्वब घेण्यात आले होते. त्यापैकी दोन महिलांचे कोरोना चाचणी आज पॉझिटिव्ह आलेली आहेत. तर निकट संपर्कात (हाय रिस्क) असलेल्या 25 व्यक्तींची रॅपिड  अँटीजन टेस्ट घेण्यात आले असून त्यात एका खाजगी रुग्णालयातील एक महिला परिचारिका (नर्स)पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती प्रांताधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन चे प्रमुख उदयसिंह भोसले यांनी दिली. वरील सर्व व्यक्ती सध्या विलगीकरण कक्षात असल्याने त्यांचे निकट संपर्कात हाय रिस्क कॉन्टॅक्ट आणि लो रिस्क कॉन्टॅक्ट असलेल्या व्यक्तींची माहिती प्रशासनाकडे उपलब्ध आहे.सांगोला येथे वैद्यकीय सर्वेक्षणाचे काम आरोग्य विभागामार्फत सुरू करण्यात आले असून आवश्यकतेनुसार पुढील कार्यवाहीसाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली.
Reactions

Post a Comment

0 Comments