दिलीपराव माने विद्यालयचा निकाल १०० टक्के
सोलापूर दि.३१(क.वृ.):दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर झाला असून निकाला मध्ये मुलींचे वर्चस्व कायम आहे. दिलीपराव माने विद्यालयाच्या मुलींनी ही बाजी मारली आहे. पहिल्या तिन्ही ही मुलींच आहेत.
उत्तर सोलापूर तालुक्यातील होनसळ येथील दिलीपराव माने विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे.
२७ विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणीत उत्तीर्ण होऊन प्रशालेचा शैक्षणिक प्रगतीचा आलेख सतत तेवत ठेवला आहे.
प्रथम श्रद्धा शुक्राचार्य गायकवाड. ८९.६८% , द्वितीय स्नेहल शरद शेंडगे ८८.२०% , तृतीय वैष्णवी तानाजी पवार ८७.४०% अनुक्रमे गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहे.
यावेळी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष संभाजी भडकुंबे , उत्तर सोलापूर पंचायत समिती सभापती रजनी भडकुंबे , प्राचार्य राजेंद्र मोहोळकर प्रशालेच्या वतीने तसेच संस्थेच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना हार्दिक अभिनंदन व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
0 Comments