तालुक्यात दोन दिवसात कोरोना ने ठोकले अर्धशतक
तुळजापूर तालुक्यात कोरोना ने दोन दिवसात ठोकले अर्धशतक !
तीन क्वारटांईन सेंन्टर फुल्ल !
तहसिल कार्यालय नागरिकांन साठी सोमवार पर्यत बंद राहणार
तुळजापूर दि.३१(क.वृ.):- तुळजापूर तालुक्यात दोन दिवसात विक्रमी संखेने ऐकावन्न कोरोना पाँजिटीव्ह रुग्ण सापडल्याने तालुक्यात सर्वञ भिती व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे .
तपासणी संख्या वाढल्याने कोरोना रुग्णाचा संखेत वाढ होत असल्याचे सांगुन या पुढेही कोरोना बाधीत रुग्णाचा संखेत वाढ होण्याचा दावा वैद्यकीय सुञाने केले आहे.
तालुक्यात गुरुवारी सोळा तर शुक्रवार रोजी दुप्पट संखेने म्हणजे पसतीस रुग्ण आढळले आहेत. शुक्रवार रोजी सर्वाधिक रुग्ण अणदूर येथे अकरा रुग्ण आढळले आहेत.त्याखालोखाल तुळजापूर सहा जळकोट सहा नळदुर्ग तीन किलज सलगरा काटी कसई सुरतगाव मसला येथे प्रत्येकी ऐक असे पसतीस रुग्ण आढळले आहे.
तुळजापूर तालुक्यात तिर्थक्षेञ तुळजापूर येथील तीन क्वारटांईन सेंन्टर फुल्ल झाले असुन शनिवार पासुन शुक्रवार पेठ भागातील आठवडा बाजार येथील नगरपरिषदेच्या नव्याने तुळजापूर विकास प्राधिकरणातुन बांधलेल्या धर्मशाळेत सुरु केले जाणार आहे या क्वारटांईन सेंन्टर चा तयारीचा आढावा उपजिल्हारुग्णालय चा वैद्यकीय अधिकारी डाँ चंचला बोडके व तहसिलदार यांनी पाहणी करुन तयारीचा आढावा घेतला .
गुरुवारी तहसिल कार्यालायातील कर्मचारी कोरोना बाधीत निघाल्याने तहसिल कार्यालया सुरक्षेचा कारणावरुन नागरिकांन साठी सोमवार पर्यत बंद ठेवले जाणार असुन मंगळवार रोजी कामकाज सुरु होणार आहे.
0 Comments