Hot Posts

6/recent/ticker-posts

सांगोला तालुका आरोग्य अधिकारी यांची चौकशी करून बदली करण्याची नगरसेवक सतिश सावंत यांची राज्याचे मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांच्याकडे मागणी

सांगोला तालुका आरोग्य अधिकारी यांची चौकशी करून बदली करण्याची नगरसेवक सतिश सावंत यांची राज्याचे मुख्यमंत्री  व आरोग्यमंत्री यांच्याकडे मागणी


सांगोला दि.३१(क.वृ.): सांगोला तालुका आरोग्य अधिकार्‍याची  तात्काळ चौकशी करून त्यांची इतरत्र बदली करावी अशी मागणी नगरसेवक सतिश सावंत यांनी राज्याचे मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.सांगोला तालुक्यात कोरोना च्या पॉझिटिव्ह रुग्णांची दिवसेंदिवस संख्या वाढत आहेत. तसेच पॉझिटीव्ह रूग्णांची हेळसांड होत असून काही रुग्णांना तर उपचाराच्या नावाखाली कोविड सेंटरमध्ये व्यवस्थित उपचारही मिळत नसल्याने रुग्णांची अवस्था बिकट झाली आहे. याबाबत प्रशासन अधिकारी मात्र सर्व काही आलबेल असल्याचे भासवत असून कोविड सेंटरमध्ये रुग्ण मात्र रामभरोसे उपचार घेत असल्याचे वास्तव समोर येत आहे याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी तर कोणतीही माहिती देत नसल्याने तालुक्यात नागरिक व रुग्णात घबराट निर्माण झाली आहे. गेल्या चार महिन्यात संपूर्ण जगभरात कोरोणा या संसर्गजन्य आजाराने दहशत माजवली आहे तालुक्यात सुरुवातीला एखादा दुसरा रुग्ण सापडला होता गेल्या महिन्याभरात मात्र या आजाराने ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये शिरकाव केल्याचे दिसून येत आहे आतापर्यंत कोरोना ने तालुक्यातील तीन जणांना मृत्यू झाला आहे सुमारे 100 च्या पुढे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत पैकी काही रुग्ण बरे झाले असले तरी या आजाराबद्दल नागरिकांत भीती मात्र कायम आहे.
सांगोला तालुका आरोग्य अधिकारी या लोकप्रतिनिधींसह पत्रकारांचे नंबर ब्लॅक लिस्टमध्ये टाकतात. त्या मुख्यालयात न राहात सोलापूरला राहतात. सोलापूरहून रोज जा-ये करतात. सोलापूर हे रेड झोन मध्ये आहे, सोलापूर मध्ये दररोज 100 ते 150 रूग्णांची वाढ होत आहे. त्यामुळे त्यांना मुख्यालयात रहाणे गरजेचे असताना त्या मुख्यालयात राहत नाहीत.  त्या कधीच कार्यालयात थांबत नाहीत. जबाबदारी झटकून टाकतात त्या कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. कर्मचार्‍यांमध्ये त्यांच्या बाबतीत तीव्र नाराजी आहेत. त्या कोणालाही माहिती देत नाहीत. प्रत्येकाला आरेरावीची भाषा वापरतात. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. त्यांनी तालुक्यात कोणत्याही आरोग्य केंद्राला भेट देऊन नागरिकांना व कर्मचार्‍यांना मार्गदर्शन केले नाही. या तालुका आरोग्य अधिकार्‍यांच्या बाबतीत तालुक्यातील सर्वच स्तरातून गेल्या अनेक महिने तक्रारी आहेत.  परंतू वरिष्ठांनी अद्याप पर्यंत दखल घेतली नाही.
तरी सदर आरोग्य अधिकारी यांची तात्काळ बदली करावी अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा नगरसेवक सतिश सावंत यांनी राज्याचे  मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments