Hot Posts

6/recent/ticker-posts

कोरोना बाधीत रुग्णांचे मनोबल वाढवण्यासाठी व आरोग्य यंत्रणेतील समस्या व अडचणी सोडवण्यासाठी दिपकआबा थेट कोविड सेंटरमध्ये

कोरोना बाधीत रुग्णांचे मनोबल वाढवण्यासाठी व आरोग्य यंत्रणेतील समस्या व अडचणी सोडवण्यासाठी दिपकआबा थेट कोविड सेंटरमध्ये


मेडशिंगी कोविड सेंटर मध्ये जाऊन कोरोना बाधित रुग्णांची विचारपूस करणारा जिल्ह्यातील पहिलाच नेता : मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील

सांगोला दि.२७(क.वृ.):सांगोला तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांच्या वाढत्या आकडेवारी संदर्भात चिंता व्यक्त करीत, मेडशिंगी कोव्हीड सेंटरला भेट देवून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची विचारपुस केली. आरोग्य प्रशासनाच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. त्याचबरोबर चिंतेत असणाऱ्या नातेवाईकांना धिर दिला. तसेच कोव्हिड सेंटर मधील समस्या दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातुन शासनाकडे तातडीने पाठपुरावा करणार असल्याचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी दिला. कोरोना बाधीत रुग्णांचे मनोबल वाढवण्यासाठी व आरोग्य यंत्रणेतील समस्या व अडचणी सोडवण्यासाठी दिपकआबा थेट कोविड सेंटरमध्ये पोहचले. कोविड सेंटर मध्ये जाऊन कोरोना बाधित रुग्णांची विचारपूस करणारा जिल्ह्यातील पहिलाच नेता मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील असल्याचे रुग्ण व त्यांच्या नातेवाईक तसेच गावातील नागरिकांमधून बोलले जात होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष आम. दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी काल रविवार दि.२६ जुलै रोजी मेडशिंगी तालुका सांगोला येथील शासकीय कोविड सेंटरमध्ये प्रत्यक्ष घटनास्थळी जावून परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी कोवीड सेंटरमध्ये जाऊन रुग्णांची विचारपूस केली. दरम्यान चिंतेत असलेल्या रुग्णांच्या कुटुंबांना आधार दिला. दरम्यान सेंटरमध्ये कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांना येणाऱ्या अडी-अडचणी, उपचार पद्धती व त्यामध्ये असणारी कमतरता तसेच मिळणाऱ्या सोयी सुविधा संदर्भात आपुलकीने विचारपूस केली. तसेच मेडशिंगी सेंटरमध्ये सध्या किती रुग्ण आहेत. या रुग्णांना उपचार देण्यासाठी आरोग्य यंत्रणेला कोणत्या गोष्टीची कमतरता भासत आहे का? याबाबत विचारणा करीत, अहोरात्र रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टर व इतर आरोग्य कर्मचारी यांच्या समवेत चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांना उपचार देऊन रुग्ण बरे करण्यात आरोग्य यंत्रणेचे मोठे योगदान आहे. यामुळे या यंत्रणेचा कामाला सलाम करीत, रुग्णांच्या आणि आरोग्य विभागातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या समस्या व अडचणी सोडवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी युवा नेते डॉक्टर पियुषदादा साळुंखे पाटील, आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी, रुग्णांचे नातेवाईक व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
राजकारणाच्या पलीकडे जाऊन अडचणीत सापडलेल्या नागरिकांना धीर देण्यासाठी व त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी थेट कोविड सेंटरमध्ये जावून आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांना मोठा आधार दिला आहे. कोविड सेंटरमध्ये जाण्याचे इतर कोणत्याच नेत्यांना आज पर्यंतच्या काळात धाडस केले नाही. जिथे आपलीच लोकं साथ सोडतात तिथे दिपकआबा धावून आले आणी मोठा धीर दिला म्हणून कोविड सेंटर मध्ये जाणारा हा जिल्ह्यातील पहिलाच लोकनेता आणी कोरोना योद्धा असल्याचे उद्गार रुग्णांनी व रुग्णांच्या नातेवाईकांनी तसेच आरोग्य विभागातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी काढले.
रुग्णालयातील रुग्णांच्या व कोविड सेंटर मधील डॉक्टर, अधिकारी-कर्मचारी यांच्या समस्या व अडचणी सोडवण्यासाठी आमचे मित्र आरोग्यमंत्री राजेश टोपे साहेब यांच्या व जिल्हाधिकारी यांच्या समोर मांडून त्वरित सोडवण्याचा प्रयत्न करणार : आम. दिपक आबा साळुंखे-पाटील
Reactions

Post a Comment

0 Comments