संशयितांना तपासणी अहवाल येईपर्यंत संस्थात्मक विलगीकरणात ठेवावे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 30, 2020

संशयितांना तपासणी अहवाल येईपर्यंत संस्थात्मक विलगीकरणात ठेवावे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना

संशयितांना तपासणी अहवाल येईपर्यंत संस्थात्मक विलगीकरणात ठेवावे-जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना




सोलापूर,दि.३०(क.वृ.): बार्शी तालुक्यातील सर्व संशयित व्यक्तींना तपासणी अहवाल येईपर्यंत संस्थात्मक विलगीकरणात ठेवावे, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या.
बार्शी तालुक्यातील कोरोना विषाणूच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी श्री. शंभरकर यांनी बैठक घेतली. त्या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या.
बार्शी नगरपालिकेच्या सभागृहात ही बैठक झाली. बैठकीस उपविभागीय अधिकारी हेमंत निकम, तहसीलदार डी.एस.कुंभार, मुख्याधिकारी शिवाजी गवळी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सौरभ होनमुटे, तालुका समन्वयक तथा सहायक निबंधक अभय कटके, ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ.शितल बोपलकर,प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक ढगे, आदी उपस्थित होते.
श्री.शंभरकर यांनी सांगितले की, कोरोनाची बाधा झालेल्या व्यक्तींच्या संपर्कातील सर्वांची त्याच दिवशी तपासणी करावी. अतिजोखमींच्या संपर्कातील आणि कमी जोखमींच्या संपर्कातील किमान वीस व्यक्तींचे ट्रेसिंग करा. नागरिकांचे सर्व्हेक्षण करा. त्यातून आयएलआय (इन्फ्लूएंजा लाईक इलनेस) आणि सारीची (सिव्हीअर ॲक्यूट रेस्पीरेटरी इलनेस) लक्षणे असणाऱ्या सर्व नागरिकांची तपासणी करा. त्यामध्ये संशयित आढळणाऱ्या व्यक्तींना होम क्वॉरंटाईन न करता इन्टिट्यूशनल क्वारंटाईनवर भर द्यावा. 
सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. अधिकाऱ्यांनी परस्परात सुसंवाद ठेवावा. कोणत्याही यंत्रणेला मनुष्यबळ अथवा साधनसामग्रीची आवश्यकता भासल्यास उपविभागीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांनी दर दोन दिवसांनी आढावा बैठक घ्यावी, अशा सूचना श्री. शंभरकर यांनी दिल्या.
श्री.शंभरकर यांनी जामगांव येथे भेट देवून  जामगावचे  सरपंच शुभांगी आवटे, उपसरपंच बालाजी गडदे, ग्रामसेवक रणजित माळवे आणि ग्रामस्थ यांच्याशी चर्चा केली. तसेच कंटेन्मेंट झोनला भेट दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages