लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देणे व
अण्णाभाऊ साठे रिसर्च अँड ट्रेनींग इन्स्टिट्यूट
अकलूज( प्रतिनिधी)अकलुज शहरातील मातंग समाजातील युवकांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देणे व अण्णाभाऊ साठे रिसर्च अँड ट्रेनींग इन्स्टीट्युट ( आर्टी ) ची स्थापना करणे बाबतचे निवेदन उध्दव ठाकरे मुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की सन २०२० हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. या निमित्ताने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देऊन गेले अनेक वर्षापासुन प्रलंबीत असलेली मागणी पूर्ण करावी ही विनंती आहे.
तसेच अनुसूचित जाती मधील समाजाचा शिक्षण स्तर उंचावण्यासाठी २००८साली बार्टी या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. परंतु या ठिकाणी मातंग समाजाला योग्य प्रमाणात न्याय मिळत नाही अशी खंत समाजातील युवका मध्ये झाली आहे. या पार्श्वभूमीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड इन्स्टिट्यूट बार्टी चे धर्तीवर आपण आपल्या जाहीरनाम्यात आश्र्वासन दिले प्रमाणे अण्णाभाऊ साठे रिसर्च अँड ट्रेनींग इन्स्टीट्युट ( आर्टी ) ची स्थापना करून मातंग समाजातील युवकांना न्याय मिळवून द्यावा असे निवेदन अकलुज शहरातील मातंग समाजातील युवकांनी इमेल व प्रांताधिकारी यांचे मार्फत शासनाकडे पाठवीले आहे. यांना निवेदनावर किरण साठे,नवनाथ साठे,सुधीर रास्ते ,रघुनाथ साठे ,सागर खंडागळे ,बाळासाहेब साठे, मारूती साठे, बाबाजी खंडागळे, अमित भिंगारदिवे विजय खंडागळे, तेजस गायकवाड, सुरज रणदिवे,शहाजी आगाडे,नानासाहेब लोखंडे, शिवाजी साठे यांचे सह्या आहेत.
0 Comments