अकलूज(प्रतिनिधी)डाॅ.धवलसिंह मोहिते-पाटील यांचे उपस्थितीत नवनाथ (भाऊ) साठे यांनी " प्रतापगड " येथे जाऊन असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षातुन जनसेवा संघटनेत प्रवेश केला.
नवनाथ भाऊ साठे यांचेबरोबर विजय खंडागळे,सुरज रणदिवे,शिवाजी साठे ,विकी बोरडे ,सागर इंगळे,योगेश माने ,अजय वाघमोडे, युवराज गोडसे,तन्वीर तांबोळी,मुस्ताक शेख,विजय जाधव
दादा खंडागळे,आकाश खंडागळे
मनोज गोसावी ,गोरख साठे
अनिस बागवान ,आदित्य गायकवाड
,जमिर शेख,अरिफ मुजावर यांचे सह असंख्य कार्यकर्त्यांनी जनसेवा संघटनेत प्रवेश केला आहे. यावेळी बोलताना नवनाथ (भाऊ )साठे म्हणाले कि डाॅ.धवलसिंह मोहिते-पाटील यांचे विचाराने प्रेरित होऊन जनसेवा संघटनेत प्रवेश केला असुन माझेवर प्रेम करणारे सर्वांना सोबतीला घेऊन जनसेवा संघटनेचे काम प्रामाणिकपणे करून लोकनेते कै. प्रतापसिंह मोहीते पाटील यांचे विचाराचा वारसा वाढवणार असे म्हणाले.
यावेळी जनसेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव इंगवले देशमुख, शंकरराव मोहिते पाटील बॅंकेचे चेअरमन सतिश नाना पालकर सरचिटणीस सुधीर रास्ते, खजिनदार रणजीतसिंह देशमुख, सह खजिनदार राजाभाऊ गुळवे, सन्मित्र संघाचे सुरेश गंभीरे, युवक सरचिटणीस मयुर माने तालुका अध्यक्ष रघुनाथ साठे, चंद्रकांत गायकवाड, महेश शिंदे, आदेश गोसावी तेजस उबाळे,संजय गाडे,उपस्थित होते.
चौकट:- जनसेवा संघटना हे माझे कुटुंब असुन या संघटनेतील प्रत्येक कार्यकर्ता हा माझ्या कुटुंबातील सदस्य आहे या कुटुंबात प्रवेश केलेल्या नवनाथ भाऊ साठे व सर्व कार्यकर्त्यांचे पाठीशी कुटुंब प्रमुख म्हणुन मी भक्कमपणे उभा राहणार
0 Comments