कोवीड केअर सेंटरचे ठिकाणी कोवीड 19 आजाराशी संबंधित सर्व औषधे उपलब्ध करून देणेची डाॅ.धवलसिंह मोहिते पाटील यांची मागणी
अकलूज(प्रतिनिधी)सोलापुर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोवीड केअर सेंटरचे ठिकाणी कोवीड 19 आजाराशी संबंधित सर्व औषधे उपलब्ध करून देणेची मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,आरोग्य मंत्री राजेशजी टोपे, पालकमंत्री,दत्तामामा भरणे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना डाॅ.धवलसिंह मोहिते पाटील यांनी दिले आहे.
या निवेदनात असे म्हटले आहे की सोलापूर जिल्ह्यात सोलापूर शहरासह ग्रामीण भागात प्रत्येक तालुक्यात कोव्हीड पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढतअसलेने महाराष्ट्र शासनाने सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात वेगवेगळ्या ठिकाणी कोव्हीड रूग्णालयाची उभारणी केली आहे. काही खाजगी रूग्णालयात कोव्हीड सेंटर चालु केले आहे. सदर ठिकाणी कोरोना पॉझिटीव्ह रुग्णावर उपचार केले जातात परंतु सदर भागामध्ये रूग्णावर उपचार करण्यासाठी लागणारी औषधे या ग्रामीण भागांमध्ये उपलब्ध नसल्याने पेशंटचे नातेवाईकांना यासाठी सोलापूर, पुणे,मुंबई या ठिकाणी हेलपाटे मारावे लागत असलेने मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. म्हणून सोलापूर जिल्ह्यात ज्या ठिकाणी कोव्हीड सेंटरची उभारणी केली आहे अशा सर्व ठिकाणी यासाठी लागणारे सर्व औषधे उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री आरोग्य मंत्री पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांचे कडे इमेल द्वारे केली आहे.
0 Comments