Hot Posts

6/recent/ticker-posts

शिक्षणाच्या सार्वत्रिकरणात विनाअनुदानचा अडथळा — आमदार दत्तात्रय सावंत

        शिक्षणाच्या सार्वत्रिकरणात विनाअनुदानचा अडथळा
                        — आमदार दत्तात्रय सावंत
                                                              डाॅ.पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेची शिक्षण परिषद

*सोलापुर—* शिक्षणाची गंगा तळागाळापर्यंत पोहचली पाहिजे.प्रत्येकाला शिक्षण घेण्याचा हक्क घटनेने दिला आहे.शिक्षणाचे सार्वत्रिकरण करण्याची जबाबदारी शासनाची आहे.या शिक्षणाच्या सार्वत्रिकरणात विनाअनुदानाचे धोरण मात्र अडथळा ठरत असल्याचे मत पुणे विभागीय शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी व्यक्त केल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण नेव्हल व प्रदेशसचिव सुनिल चव्हाण यांनी दिली..
   डाॅ.पंजाबराव देशमुख राष्टीृय शिक्षक परिषदेच्या १० व्या राष्टृव्यापी आॅनलाईन शिक्षण परिषदेत ते बोलत होते.शिक्षण परिषदेचा आज सहावा दिवस होता.शिक्षकांच्या समस्या व उपाय या विषयावर आमदार दत्तात्रय सावंत बोलत होते.संघटनेचे राष्टीृय अध्यक्ष पप्पु पाटील भोयर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.विनाअनुदानित धोरणामुळे शिक्षकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे.१४ ते १५ वर्ष ज्ञानार्जन करुनही त्यांचा वेतनाचा प्रश्न सुटत नाही.विनाअनूदानित धोरणामुळे अनेक शिक्षकांनी आत्महत्या केल्या आहेत.अनुदान मिळण्याच्या प्रक्रीयेतील अटी शिथिल करण्याची आवश्यकता आहे.अंश;ता अनुदान प्राप्त शाळांनी दरवर्षी  पुढील वाढीव टप्पा मिळणे अपेक्षित असताना मागील शासनाने तीन — चार वर्षापासुन त्यांना अनुदानापासुन वंचित ठेवले आहे.हे फक्त महाराष्टाृतच घडत आहे.विनाअनुदानित प्रक्रीयेतुन मी गेल्यामुळे आमदार झाल्यानंतर  सर्वप्रथम विनाअनुदानित शिक्षकांच्या प्रश्न सोडवला.शिक्षकांच्या कॅशलेस मेडीकल योजनेचा प्रश्न अंतिम टप्यात असुन तो लवकरच मार्गी लागेल.जुन्या पेंन्शन योजनेसाठी सर्व संघटनांनी एकत्र येऊन राज्यव्यापी लढा देण्याची आवश्यकता आहे.

*विनाअनुदानित शिक्षक बांधवासाठी शेगाव ते नागपुर विधानभवनापर्यंत पायी दिंडी काढली.पुण्यातील भिडे वाड्यापासुन मंत्रालयापर्यंत पावसात पदयात्रा काढली.विधानभवनात अनेकदा प्रश्न उपस्थित केला.विधानभवनात प्रश्न न सुटल्यामुळे रस्त्यावरची लढाईसुद्धा लढली.*

या कार्यक्रमाचे आभार जिल्हाध्यक्ष विनोद आगलावे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंबादास रेडे, राजकीरण चव्हाण,हणमंत भोसले,अनिल गायकवाड,दिपक डांगे,संजय निंबाळकर,शांताराम जळते,विशाल पवार,प्रकाश बाळगे,संतोष रजपुत,हणमंत पवार आदींनी प्रयत्न केले.या आॅनलाईन शिक्षण परिषदेत राज्यातील ४००० शिक्षकांनी सहभाग घेतला.
Reactions

Post a Comment

0 Comments