रॅपीड अँटीजन टेस्ट मध्ये सांगोला तालुक्यात आढळले पुन्हा दोन कोरोना पॉझिटिव्ह
![]() |
प्रांताधिकारी उदयसिंह भोसले |
सांगोला (प्रतिनिधी) सांगोला तालुक्यांमध्ये आज कोळा, पाचेगाव बु व किडेबिसरी येथे कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात असलेल्या एकूण 33 व्यक्तीची तपासणी केली करण्यात आली त्यामध्ये कोळा येथील एक महिला पॉझिटिव्ह आढळून आली असून घेरडी येथील कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कामध्ये आलेल्या दोन व्यक्तींची तपासणी केली असता एक व्यक्ती पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आज ग्रामीण भागात कोळा व घेरडी येथे कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.
![]() |
तहसीलदार योगेश खरमाटे |
तसेच आज सांगोला नगरपरिषद हद्दीमध्ये कोरोना बाधित व्यक्तीच्या निकट संपर्कात (high risk contacts) असलेल्या 13 व्यक्तींची रॅपीड ॲन्टीजन टेस्ट घेण्यात आली. त्यामध्ये एकही व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आलेली नाही. अशा प्रकारे आज एकूण मिळून 48 व्यक्तींची कोरोना बाबतची रॅपिड ॲंटिजन तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एकूण दोन व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आलेल्या आहेत. वरील दोन्ही कोरोनाबाधित व्यक्तींचे प्राथमिक आरोग्य केंद्र मेडशिंगी येथे विलगीकरण करण्यात आले असून त्यांचे निकट संपर्कात (high risk contacts) आणि (low risk contacts) असलेल्या व्यक्तींची माहिती घेणेचे काम सुरू आहे. सांगोला येथे वैदयकीय सर्वेक्षणाचे कामकाज आरोग्य विभागामार्फत सुरु करणेत आलेले आहे. आवश्यकते नुसार पुढील कार्यवाहीसाठी प्रशासन सज्ज आहे. असे आवाहन उप विभागीय अधिकारी श्री. उदयसिंह भोसले, तहसीलदार योगेश खरमाटे यांनी सांगितले .
0 Comments