विविध परिसरातील गरजू व्यक्तींना मोफत अन्नदान उपक्रम...
सोलापूर दि.२६(क.वृ.):- येथील सामाजिक कार्यकर्ते प्रा. गणेश लेंगरे यांच्या वतीने जय हिंद फूड बँकेच्या माद्यमातून सोलापूर शहरा मधील विविध भागातील गरजू 100 लोकांना एक वेळेचं जेवण मोफत देण्यात आले. कोरोना च्या पार्श्वभूमीवर शहरात लॉकडाऊन असल्यामुळे बऱ्याच गरजू लोकांना एक वेळेचं जेवण मिळत नाहीये अश्या परिस्थिती प्रा.गणेश लेंगरे यांनी सामाजिक बांधिलकी जपत या गरजू व्यक्तींना मोफत अन्नदान करण्यासाठी योगदान दिले आहे. यावेळी अक्कलकोट रोड ,सिद्धेश्वर मंदिर,जिल्हा परिषद जवळील दर्गा परिसरात,स्टेशन रोड इत्यादी परिसरातील गरजुंना हे जेवण जय हिंद फूड बँक चे उपाध्यक्ष प्रा. विक्रमसिंह बायस यांच्या मार्फत देण्यात आले. यावेळी बोलताना प्रा.विक्रमसिंह बायस म्हणाले की रस्त्यावरील अश्या गरजू लोकांना मदत करण्यासाठी समाजातील अनेक व्यक्तींनी पुढे येणे गरजेचे आहे. जेणेकरून या गरजुंच्या एका वेळेच्या जेवणाची अडचण दूर होण्यास मदत होईल. यावेळी जयहिंद फूड बँकेच्या वतीने प्रा.गणेश लेंगरे यांचे आभार मानण्यात आले. याप्रसंगीं राजेश वडीशेरला, ओम घुले हे उपस्थित होते.
0 Comments