Hot Posts

6/recent/ticker-posts

संत नामदेव महाराज वंशज पंढरपूर यांच्या वरील गुन्हे मागे घ्या असे भाविक वारकरी मंडळ कडून पालकमंत्री भरणे यांना निवेदन

संत नामदेव महाराज वंशज पंढरपूर यांच्या वरील गुन्हे मागे घ्या असे भाविक वारकरी मंडळ कडून पालकमंत्री भरणे यांना निवेदन 


पंढरपूर दि.२६(क.वृ.): श्रीक्षेत्र पंढरपूर येथे दरवर्षी आषाढी सोहळा महाद्वार काला (प्रसाद) परंपरेने केला जातो. त्याला अधिकृत परवानगी देऊन काला प्रसाद करणे शासन जबाबदारी होती. पण तसे न केल्यामुळे ही परंपरा सांभाळण्यात यावी म्हणून नामदास महाराज व हरिदास महाराज यांनी महाद्वार काला केला.त्यामुळे जमाव बंदी कायदा अंतर्गत पाच जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.ते सर्व गुन्हे ताबडतोब रद्द करण्यात यावे. लग्न, मयतला 50 जणांना परवानगी असताना फक्त 50 जण आहेत. हे कधी पाहिलं आहे का ? मग सर्व नियम वारकरी परंपरेलाच का ? त्यामुळे वारकरी परंपरा मोडीत काढण्याचा मोठा कट असल्याचे वाटते. आत्ता पर्यंतचे संतांचे व वारकरी भाविकांचे योगदान विचारात घेऊन त्याअनुषंगाने असलेल्या परंपरेतील महाराज यांच्या वरील गुन्हे ताबडतोब रद्द करण्यात यावे असे निवेदन  सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय  भरणे मामा यांना 
ह.भ.प.सुधाकर इंगळे महाराज (राष्ट्रीय अध्यक्ष ) बळीराम जांभळे (राष्ट्रीय सचिव ) यांनी प्रत्यक्ष भेटून दिले. त्या संबंधी चर्चा ही करण्यात आली. 
जोतिराम चांगभले (जिल्हा अध्यक्ष),बंडोपंत कुलकर्णी, (जिल्हा उपाध्यक्ष ),मोहन शेळके,(जिल्हा सचिव ), संजय पवार (शहर अध्यक्ष), दत्तात्रय भोसले (शहर सचिव ),आदर्श इंगळे, शिवानंद जाधव व सर्व पदाधिकारी यांची निवेदन प्रसंगी उपस्थिती होती. 
Reactions

Post a Comment

0 Comments