जिवा-सेना संघटनेच्या नुतन पदाधिकार्यांची निवड;
शहराध्यक्षपदी बाळासाहेब काळे तर
उपशहराध्यक्षपदी संदीप गोरे
पंढरपूर (प्रतिनिधी) :- जिवा-सेना संघटनेच्या नुतन पदाधिकार्यांची निवड नुकतीच करण्यात आली. संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष कमलाकार (माऊली) चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सोशल डिस्टन्स राखुन व आवश्यक ती खबरदारी घेवुन निवडीचा हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी पंढरपूर शहराध्यक्षपदी बाळासाहेब काळे, उपाध्यक्षपदी संदीप गोरे, सचिवपदी महेश गोरे, कार्याध्यक्षपदी सुनील खंडागळे यांची निवड करण्यात आली. सोलापूर जिल्हाध्यक्ष कमलाकार (माऊली) चव्हाण यांनी सर्वांना निवडीचे पत्र दिले. यावेळी सर्व नुतन पदाधिकार्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सोमनाथ खंडागळे उपस्थित होते.
संस्थापक अध्यक्ष नंदकुमार खरे यांच्या मार्गदर्शनाखाली जीवा सेना संघटना ही नाभिक समाजाच्या सर्वांगीन विकासासाठी संपुर्ण महाराष्ट्रात कार्य करत आहे. नाभिक समाज हा न्याय्य हक्कापासुन, विकासापासुन आणि ऐक्यापासुन कोसो दुर आहे. आपल्या कार्यातुन समाजाच्या शेवटच्या घटकाला सुधारण्यासाठी लक्ष केंद्रीत करुन संघटनेच्या ध्येय धोरणानुसार कार्य करु. असे मत यावेळी नुतन पदाधिकार्यांनी व्यक्त केले.
जिवा-सेना संघटनेच्या माध्यमातुन आम्ही नाभिक समाजातील तरुणांना एकत्रीत आणुन एक मजबुत संघटन निर्माण केले आहे. संपुर्ण सोलापूर जिल्ह्यात संघटनेचे जाळे निर्माण करत आहोत. त्यानुसार पंढरपूर शहर व तालुक्यातील नुतन पदाधिकार्यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत. संपुर्ण शहर व तालुक्यातील नाभिक समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी नुतन पदाधिकारी व कार्यकर्ते प्रयत्न करतील अशी अपेक्षा असल्याचे मत यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कमलाकार (माऊली) चव्हाण यांनी व्यक्त केले.

0 Comments