Hot Posts

6/recent/ticker-posts

स्वामित्व योजनेअंतर्गत गावठाणांची ड्रोनद्वारे होणार मोजणी दक्षिण सोलापुरातील दहा गावांचा समावेश

स्वामित्व योजनेअंतर्गत गावठाणांची ड्रोनद्वारे होणार मोजणीदक्षिण सोलापुरातील दहा गावांचा समावेश



सोलापूर, दि.२८(क.वृ.): स्वामित्व योजनेअंतर्गत गावठाणांचे भूमापन करुन मिळकत पत्रिका देण्याच्या राज्य शासनाच्या उपक्रमाला सुरुवात झाली आहे. या योजनेअंतर्गत दक्षिण सोलापूर तालुक्यातील दहा गावांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती भूमी अभिलेख उपअधीक्षक किरण कांगणे यांनी दिली.
श्री. कांगणे यांनी सांगितले की, ड्रोनद्वारे  सर्व गावांच्या मिळकतीची मोजणी  मार्च ते मे या कालावधीत करण्यात येणार होती. मात्र कोरोनाच्या संसर्गामुळे ती करता आली नाही. मात्र राज्य शासनाने सध्या एक हजार गावांतील गावठाणांची ड्रोनद्वारे मोजणी करुन 2ऑक्टोबर 2020 पर्यंत मिळकत पत्रिका देण्याचे निश्चित केले आहे. यासाठी सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिरवळ, इंगळगी, आलेगांव, वोरुळ, कणबस, बंकलगी, तिल्हेहाळ, हिपळे, सिंदखेड, आचेगांव या गावांची निवड केली आहे.
गावठाण भूमापन योजना अत्यंत महत्वपूर्ण आणि उपयुक्त योजना आहे.  योजना यशस्वी होण्यासाठी आपल्या मिळकतीचे सिमांकन वेळेवर करुन घ्यावे व ग्रामविकास अधिकारी /भूमी अभिलेख  अधिकारी व कर्मचारी यांना सहकार्य करावे, असे आवाहन श्री. कांगणे यांनी केले आहे.
स्वामित्व योजनेची वैशिष्ट्ये व फायदे
  • गावठाणातील प्रत्येक घराचा नकाशा तयार होणार
  • धारकांना मिळकतीचे सीमा व नेमके क्षेत्र  माहिती होणार
  • गावठाणातील धारकांना मालमत्तेचे अधिकार मिळणार
  • विविध आवास योजनेअंतर्गत मंजूरी करणे सुकर होईल
  • मालमत्तेचे मालकी हक्क संबंधी अभिलेख व नकाशे तयार झाल्याने आर्थिक पत उंचावेल
  • गावठाणातील जागेचे मालकी व हद्दीसंबंधी वाद/तंटे संपुष्टात येतील
  • गावठाणातील जमिनीचे खरेदी-विक्री व्यवहारामध्ये होणारी फसवणूक टळेल
  • गावठाणातील सार्वजनिक जागा, बखळ जागा, रस्ते, नाले यांचे नकाशे व अभिलेख तयार होणार असल्याने सार्वजनिक मालमत्ताचे  होणार संरक्षण

ड्रोन सर्व्हे कामी ग्रामस्थांनी/नागरिकांनी काय करावे
  • नागरिकांनी ग्रामसंभेस उपस्थित राहावे. 
  • ग्रामपंचायतीकडील अभिलेखामध्ये वारस नोंदी अद्ययावत कराव्यात. 
  • कर्मचारी यांनी मागणी केल्यास भ्रमणध्वनी/पत्ते उपलब्ध करुन द्या. 
  • गावात न राहणाऱ्या शेजाऱ्यांची  माहिती देणे, त्यांचे संपर्क क्रमांक ग्रामसेवक व भूमी अभिलेख अधिकारी, कर्मचारी यांना उपलब्ध करुन द्यावेत. 
Reactions

Post a Comment

0 Comments