Hot Posts

6/recent/ticker-posts

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वाखरी येथील कोविड सेंटरला 25 लिटर सॅनिटायझरची मदत!


मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वाखरी येथील कोविड सेंटरला 25 लिटर सॅनिटायझरची मदत!


राजवीर राजलक्ष्मी बहुउद्देशीय सामाजीक संस्था व शिवसेनेचा उपक्रम
पंढरपूर दि.२८(क.वृ.):- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना व राजवीर राजलक्ष्मी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने वाखरी (ता.पंढरपूर) येथील कोविड सेंटरला 25 लिटर सॅनिटायझरची मदत करण्यात आली. आज पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांचेकडे ही मदत सुपूर्त करण्यात आली. यावेळी महिला आघाडीच्या तालुका प्रमुख सौ.आरती ओंकार बसवंती, राजवीर राजलक्ष्मी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ओंकार बसवंती (शिवसेना माजी उपशहरप्रमख), युवराज गोमेवाडीकर (शिवसेना माजी उपशहरप्रमुख), सचिन खंकाळ (शिवसेना माजी उपशहरप्रमुख) आदी उपस्थित होते.
संपुर्ण जागावर सध्या कोरोनाचे संकट आहे. आपल्या महाराष्ट्रात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केलेल्या आहेत. तळागळातील सर्वसामान्यांना या कठीण काळात शासनाकडून आवश्यक ती सर्व मदत आणि दिलासा मिळत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सुध्दा शिवसैनिक म्हणुन या कठीण काळात समाजाच्या हितासाठी आणि कोरोनाच्या संकटकाळात मदत म्हणून वाखरी येथील कोविड सेंटरसाठी 25 लिटर सॅनिटायझरची मदत प्रांताधिकारी सचिन ढोले यांचेकडे सुपूर्त केली आहे. असे मत यावेळी ओंकार बसवंती यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना उदंड आयुष्य लाभावे आणि त्यांनी हाती घेतलेल्या प्रत्येक कार्यात यश मिळावे अशी प्रार्थना करुन आणि मा. मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसारच आम्ही त्यांच्या वाढदिवसानिमित्त इतर अनावश्यक खर्चाला फाटा देवुन आज काळाची गरज ओळखून ही मदत कोविड सेंटरला करत असल्याची भावना यावेळी सौ.आरती बसवंती यांनी व्यक्त केली. प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी यावेळी राजवीर राजलक्ष्मी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. आणि कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर योग्य ती खबरदारी घेत आपली व आपल्या परिसरातील नागरिकांची काळजी घ्यावी असे सांगितले.


Reactions

Post a Comment

0 Comments