Hot Posts

6/recent/ticker-posts

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत 43 दवाखान्यांचा समावेश ; जिल्ह्यात आतापर्यंत 705कोरोना रूग्णांनी घेतला लाभ

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत 43 दवाखान्यांचा समावेशजिल्ह्यात आतापर्यंत 705कोरोना रूग्णांनी घेतला लाभ



सोलापूरदि.31(क.वृ.): राज्य शासनाने सर्वसामान्य जनतेला मोफत आरोग्य सेवा मिळण्यासाठी महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजनेचा प्रारंभ केला. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने ही योजना सर्वांसाठी खुली असून सोलापूर जिल्ह्यात 43 दवाखान्यात या योजनेचा लाभ 705 रूग्णांना मिळाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. तसेच रूग्ण गंभीर असेल तरच या योजनेतून मोफत उपचार मिळणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील जनतेला गंभीर आजारांवरील उपचारांसाठी पूर्णपणे नि:शुल्क आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधेचा लाभ विशेषज्ञ सेवांतर्गत पॅकेजेससाठी अंगीकृत रुग्णालयांमधून उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे.
सोलापूर जिल्ह्यातील 8 लाख 13 हजार 278 कुटुंबांना योजनेचा लाभ मिळू शकतो. 2 जुलै ते 26 जुलै 2020 पर्यंत आतापर्यंत 1 लाख 56 हजार 954 रूग्णांना महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घेतला आहेयामध्ये 705 रूग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे योजनेच्या जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकला जगताप यांनी सांगितले. कोविड-19 साठी जिल्ह्यातील दवाखाने अधिग्रहित केले आहेत. यामध्ये 80 टक्के बेड हे कोरोना रूग्णांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. जे दवाखाने महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत आहेतत्यातील एकूण बेडच्या 25 टक्के बेड हे या योजनेतील रूग्णांसाठी राखीव असणार आहेतअसेही त्यांनी स्पष्ट केले.
या योजनेत कोविड-19 साठी 20 आजारांचा समावेश करण्यात आला आहे. क्रिटीकल केअरपल्मॉलॉजीनेफ्रॉलॉजीपिडियाट्रीक मेडिकल मॅनेजमेंट आणि इन्डोक्रिनॉलॉजी या तज्ज्ञ सेवांचे 20 प्रकारचे उपचारांचा समावेश आहे. कोविड-19 च्या चाचणीचा (RtPCR) समावेश या योजनेतील तपासण्यांच्या यादीत नाही. योजनेंतर्गत मंजूर उपचारासाठी प्रयोगशाळा व इमेजिंग तपासण्या आंतररूग्ण सेवासुश्रुषा सर्जनभूलतज्ज्ञांचे शुल्कतपासणी फीऔषधेरक्त व रक्त घटक कन्झुमेबल्सडिस्पोजेबल्सशस्त्रक्रिया गृहशुल्कआहार आणि परतीचा प्रवास याची सोय मोफत करण्यात येत आहे.
क्रिटीकल केअरमध्ये अक्युट ब्रोन्चिटीस आणि न्युमोनिया वूईथ रेस्पिरेटरी फेलर(व्हेंटिलेटर 10 दिवस)सेप्टिक शॉकएआरडीएस प्लस डीआयसी (रक्त आणि रक्तघटक)एआरडीएस व्हेंटिलेटरसह 14 दिवसएआरडीएस वूईथ ऑर्गन फेलर (व्हेंटिलेटर 14 दिवस)ॲक्यूट सेव्हर अस्थमा अक्यूट रेस्पिरेटरी फेलर आणि सीओपीडी रेस्पिरेटरी फेलर (इन्फेक्टिव्ह एक्झासरबेशन) (व्हेंटिलेटर 14 दिवस)नेफ्रॉलॉजीमध्ये रॅपिडली प्रोग्रेसिव्ह रेनल फेलर (10 दिवस)पल्मॉनॉलॉजीमध्ये अक्यूट रेस्पिरेटरी फेलर (व्हेंटिलेटरशिवाय 10 दिवस)अक्यूट रेस्पिरेटरी फेलर (व्हेंटिलेटरसह 10 दिवस)न्यूमोथ्रॉक्स (लार्ज/रिकरंट) एचआरसीटीपिडियाट्रीक्स मेडिकल मॅनेजमेंटमध्ये अक्यूट ब्रोन्चो/लोबारन्यूमोनिया पायो न्यूमोथ्रॉक्ससह 14 दिवससेवर अस्पिरेशन न्यूमोनिया (व्हेंटिलेटरशिवाय)सेवर अस्पिरेशन न्यूमोनिया (व्हेंटिलेटर)अक्यूट सेवर अस्थमा (व्हेंटिलेटर)सेवर ब्रोन्चोन्यूमोनिया (व्हेंटिलेटरशिवाय)सेवर ब्रोन्चोन्यूमोनिया (व्हेंटिलेटरसह)अक्यूट ब्रोन्चो/लोबारन्यूमोनिया इम्पिमा/प्लेरल इन्फूजनसहइन्डोक्रिनॉलॉजीमध्ये लोवर रेस्पिरेटरी ट्रक्ट इन्फेक्शन (10 दिवस) आणि पल्मॉनॉलॉजीमध्ये इंटर्सटीशिअल लंग्जचा आजार (10 दिवस) यांचा 20 आजारामध्ये समावेश आहे. महागडी इंजेक्शन रूग्णांना स्वखर्चाने बाहेरून घ्यावी लागणार आहेत.       
कोरोना काळात कोणाला मिळेल लाभ
सध्या कोरोनाच्या संसर्गामुळे ही योजना 31 जुलै 2020 पर्यंत महाराष्ट्र शासनाने सर्व रेशनकार्डधारकांच्या कुटुंबासाठी खुली केली आहे.
सध्या उत्पन्नाची अट नाही.
इतर वेळी योजनेचे लाभार्थी
पिवळ्या,अंत्योदय अन्न योजना, अन्नपूर्णा योजना व केशरी (एक लाख रूपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न ) शिधापत्रिकाधारक कुटुंबे.
औरंगाबादअमरावती विभागातील सर्व जिल्हेनागपूर विभागातील वर्धा या शेतकरी अवर्षणग्रस्त जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिका शेतकरी कुटुंबे.
शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थी, शासकीय महिला आश्रमातील महिला, शासकीय अनाथ आश्रमातील मुले, शासकीय वृद्धाश्रमातील जेष्ठ नागरिक, माहिती व जनसंपर्क कार्यालयाकडील निकषानुसार पत्रकार व त्यांची कुटुंबेबांधकाम व इतर बांधकाम कामगार व त्यांची कुटुंबे.
लाभ कसा घ्याल
योजनेत असलेल्या दवाखान्यातील आरोग्यमित्राकडे संपर्क साधा.
आरोग्यमित्र रुग्णाची योजनेंतर्गत ऑनलाईन नोंदणी करतात. रुग्णालयात उपचार घेतांना योग्य ते सहाय्य व मदत करतात.
उपचार पूर्व मान्यता घ्यावी लागते.
कागदपत्रांची पडताळणी करून मान्यता नाकारण्यात आलेली प्रकरणे तांत्रिक समितीकडे पाठविली जातात. त्यांच्या निर्णयामध्ये तफावत असल्यास अंतिम मान्यतेसाठी राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या सहाय्यक संचालकाकडे पाठविण्यात येतात. ही प्रक्रिया 12 तासात पूर्ण होणे अपेक्षित आहे. इमर्जन्सी केसेसमध्ये रूग्णालयांद्वारे Emergency Telephonic Intimation (ETI) घेतले जाते. अशा केसेसमध्ये रुग्णांना वैध शिधापत्रिका 120 तासाच्या आत सादर करणे आवश्यक असते.
योजनेत समाविष्ट उपचार
योजनेंतर्गत 34 विशेषज्ञ सेवांतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत 996 उपचार व शस्त्रक्रिया. 121 पाठपुरावा सेवांचा समावेश आहे.
प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत 1209 उपचार व 183 पाठपुरावा सेवांचा समावेश आहे.
एकत्रित योजनेंतर्गत लाभार्थ्यांना सर्वसाधारण शस्त्रक्रिया, नेत्र शस्त्रक्रिया, स्त्री रोगावरील शस्त्रक्रिया, अस्थिव्यंग शस्त्रक्रिया, हृदय शस्त्रक्रिया व उपचार, जठर व आतड्याच्या शस्त्रक्रिया व उपचार, बालरोग शस्त्रक्रिया व उपचार, मेंदू व मज्जासंस्था यांचे आजारावरील शस्त्रक्रिया व उपचार, प्लास्टिक सर्जरी, जळीत रुग्णावरील उपचार, कृत्रिम अवयव, आकस्मिक वैद्यकीय उपचार, त्वचेच्या, सांध्याच्या व फुफ्फुसाच्या आजारावरील आकस्मिक उपचार, ऐनडोक्राईन, लहान मुलांचे कर्करोग, मानसिक आजार व इंटरव्हेशनल रेडीऑलोजी उपचार.
प्रती कुटुंब प्रती वर्ष आर्थिक मर्यादा
महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत लाभार्थी कुटुंबाला प्रति कुटुंब प्रति वर्ष 1.50 लाख रूपयांपर्यंत विमा संरक्षण मिळते. मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी ही मर्यादा 2.50 लाख आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत प्रति कुटुंब प्रति वर्षी पाच लाख रूपयांपर्यंत विमा संरक्षण मिळते. लाभार्थी कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीला किवा अनेक व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येईल.
कागदपत्रे काय लागतात...
सर्व प्रकारची रेशनकार्ड (नसेल तर स्वयं घोषणापत्र किंवा तहसीलदारांचे पत्र)
फोटो ओळखपत्र (आधारकार्डराष्ट्रीयकृत बँकेचे पासबुकपॅनकार्डअधिकारीकर्मचारी ओळखपत्र)
लहान मुलांचा जन्मदाखला किंवा बोनाफाईड.

योजनेचा लाभ मिळणारी जिल्ह्यातील हॉस्पिटलत्यांचे एकूण बेड आणि आरोग्यमित्रांचे संपर्क क्रमांक
सोलापूर
अश्विनी रूरल मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल (300 बेड)आरोग्यमित्र तौहिद फुलमामडी (9372144492)रमेश रणखांबे (7709251324) आणि राजकुमार जाधव (9423602380)छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालय (733 बेड)आरोग्यमित्र प्रवीण गायकवाड (9561247355) आणि विष्णू गायकवाड (8956195176)डॉ. चिडगुपकर हॉस्पिटल प्रा.लि. (30बेड)आरोग्यमित्र फार्दिन अकबर मुल्ला (9860523169) आणि अस्मा कुडाळे (8975480480)डॉ. कासलीवाल मेडिकल केअर ॲन्ड रिसर्च फाऊंडेशनचे कासलीवाल हॉस्पिटल (50 बेड)आरोग्यमित्र शिवशंकर वळसंगे (8308665612)डॉ. रघोजी किडनी हॉस्पिटल ॲन्ड रिसर्च सेंटर प्रा.लि. (30 बेड)आरोग्यिमत्र सिद्धाराम माळी (9922999177) आणि विकास मालवडकर (9021189888)गंगामाई हॉस्पिटल (100 बेड)आरोग्यमित्र सुशिल पवार (9595211864)भानुदास हेगडे (9130422453) आणि विशाल पुदाले (8087560017)जनकल्याण हॉस्पिटल (100 बेड)आरोग्यमित्र गोपाळ कौलगे (9860152075)युगंधर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल (50 बेड)आरोग्यमित्र सीमा गाडे (9922222684)लोकमंगल जीवक हॉस्पिटल ॲन्‍ड रिसर्च सेंटर (30 बेड)आरोग्यमित्र नासिर निगेहबान (9405233493)रिलाइन्स हॉस्पिटल (50 बेड)आरोग्यमित्र समीर शिंदे (9423535036)श्री सिद्धेश्वर कॅन्सर हॉस्पिटल ॲन्‍ड रिसर्च सेंटर (50 बेड)आरोग्यमित्र शशिकांत गायकवाड (7798961161)सोलापूर कॅन्सर सेंटर (50 बेड)आरोग्यमित्र सिद्धाराम वाले (9403295140)यशोधरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल प्रा.लि. (200 बेड)आरोग्यमित्र ओमेश शिंदे (8983456775)धनराज गिरजी हॉस्पिटल (150 बेड)आरोग्यमित्र उमेश जमादार (9975945054)मोनार्च हॉस्पिटल (100 बेड)आरोग्यमित्र श्यामसुंदर टंकसाळ (9096189255)श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रूग्णालय ॲन्ड रिसर्च सेंटर (150 बेड)आरोग्यमित्र शशिकांत सकट (9890980657)अश्विनी सहकारी रूग्णालय (305 बेड)आरोग्यमित्र अमोल शिंदे (9922882505) आणि सुमित जाधव (9922886494)चंदन न्यूरोसायन्स हॉस्पिटल (48 बेड)आरोग्यमित्र इमरान हिंगनीकर (8208737715).
अकलूज : अकलूज क्रिटीकल केअर ॲन्ड ट्रॉमा सेंटर (50 बेड)आरोग्यमित्र सुप्रिया वीर (9503788557) आणि एकनाथ पवार (9921076918)देवडीकर मेडिकल सेंटर (30 बेड)आरोग्यमित्र नवनाथ लोखंडे (9960170630)कदम मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल (60 बेड)आरोग्यमित्र पितांबर मिसाळ (8275089208) आणि नवनाथ केंगार (9822749310)उपजिल्हा रूग्णालय (50बेड)आरोग्यमित्र जगन्नाथ कवितके (9421103088)सूर्यवंशी ट्रॉमा ॲन्ड रिहॅबिलेटेशन सेंटर (45 बेड)आरोग्यमित्र अनिकेत सरतापे (8999286102) आणि शिवाजी शिकरे (9921882143).
पंढरपूर : लाईफलाईन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल (50 बेड)आरोग्यमित्र आनंद भानवसे (9879003340)नवजीवन चिल्ड्रन हॉस्पिटल (50 बेड)आरोग्यमित्र राजेंद्र गुरव (9011672031) आणि हरिदास चौगुले (9763889812)समर्थ हॉस्पिटल (50 बेड)आरोग्यमित्र श्रीनिवास पवार (9860152075)उपजिल्हा रूग्णालय (50 बेड)आरोग्यमित्र सादिक शेख (9970796978)सेवा हॉस्पिटल (50 बेड)आरोग्यमित्र अभिजित राऊत (9503041637)श्री गणपती मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल (50 बेड)आरोग्यमित्र सागर वाघमारे (7709093682)पंढरपूर सुपरस्पेशालिटी ॲन्ड गॅलक्सी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल (30 बेड)आरोग्यमित्र अकिल मुजावर (8055086188).
बार्शी : अश्विनी रूरल कॅन्सर रिसर्च ॲन्ड रिलिफ सोसायटी (137 बेड)आरोग्यमित्र रामचंद्र चिकने (9096837135)रामकृष्ण घुले (9881500683) आणि शरद बागल (9822963838)सुविधा आयसीयू ॲन्ड कॅथलॅब सेंटर (40 बेड)आरोग्यमित्र रवी मिरगणे (9765352136) आणि सिद्धार्थ थोरात (9765766258)ग्रामीण रूग्णालय (50 बेड)आरोग्यमित्र ज्ञानेश्वर डोंगरे (9623685728)कल्याणरावजी भातलवंडे बालरूग्णालय आयसीयू सेंटर (50 बेड)आरोग्यमित्र मंजूर शेख (8652390550)जगदाळेमामा हॉस्पिटल (300 बेड)आरोग्यमित्र अनिता जाधवर (7350907114)सुश्रूत हॉस्पिटल (50 बेड)आरोग्यमित्र करीम शेख (9881334768).
मंगळवेढा : दामाजी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल (50 बेड)आरोग्यमित्र रघुनाथ शिंदे (9096427472)महिला हॉस्पिटल (100 बेड)आरोग्यमित्र तानाज चव्हाण (9049599435).
करमाळा : उपजिल्हा रूग्णालय (50 बेड)आरोग्यमित्र अतुलसिंह चव्हाण (9689289079).
मोहोळ : ग्रामीण रूग्णालय (30 बेड)आरोग्यमित्र शुभांगी गवळी (9145728799).
सांगोला : डॉ. लवटे आर्थो हॉस्पिटल ॲन्ड ट्रॉमा सेंटर (50 बेड)आरोग्यमित्र लतिका तोरणे (7045142354)सांगोला आयसीयू ॲन्ड मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल (10 बेड)आरोग्यमित्र आसिफ पठाण (9975697892)श्रीनंद बालरूग्णालय (18 बेड)आरोग्यमित्र अजिज शेख (9730657247).
Reactions

Post a Comment

0 Comments