Hot Posts

6/recent/ticker-posts

एकावर ही अन्याय न होता रीतसर पंचनामे करून योग्य तो मोबदला द्या

एकावर ही अन्याय न होता रीतसर पंचनामे करून योग्य तो मोबदला द्या  


मोहोळ : सोलापूर मंगळवेढा राष्ट्रीय महामार्गाचे कामकाज सुरू असून त्या रस्ताच्या कामाकरिता लगतच्या शेतजमीन,घरे,छोटे मोठे व्यावसायिकांची दुकानाचे रीतसर पंचनामे करून योग्य तो नुकसानभरपाई चा मोबदला द्या.अन्यथा एकही शेतकरी,छोटे मोठे व्यावसायिकावर अन्याय झाला तर याद राखा असा सज्जड दम मोहोळ चे आमदार  यशवंत माने यांनी संबंधित विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांना दिला आहे.
    सध्या सुरू असलेल्या सोलापूर मंगळवेढा राष्ट्रीय मार्गावरील कामती (ता.मोहोळ) येथील शेतकरी व छोटे मोठे व्यावसायिकांच्या प्राप्त झालेल्या तक्रारीनी नुसार माजी आमदार मा श्री राजनजी पाटील व बाळराजे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आ. यशवंत माने यांनी सोलापूर मंगळवेढा राष्ट्रीय मार्गावरील कामती परिसराला भेट देवून पाहणी केली.यावेळी अधिकारी व ठेकेदार यांच्या कडून होत असलेल्या मनमानी कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करून कडक शब्दात इशारा दिला आहे. तसेच पोलिसांनी सुद्धा सहकार्य करावे असे सुचना दिल्या.
    याप्रसंगी सोलापूर दुध संघाचे संचालक दीपक माळी,शिवसेनेचे तालुकाध्यक्ष अशोक भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक उंदरे,माजी सरपंच गोरख खराडे,ॲड.किरण सराटे,कामती खुर्द चे सरपंच समीरने,उपसरपंच दादासाहेब मोठे,बालाजी पवार,संजय माळी, महावीर तरंगे,अंकुश माळी,महेश पवार,विरवडे चे युवा नेते नवनाथ आवताडे,स्वीय सहाय्यक संतोष ननवरे यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थ शेतकरी व्यावसायिक उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments