भाजपकडून घर संपर्क कार्यक्रमास सुरूवात देशमुखांच्या हस्ते पंतप्रधानांच्या पत्रांचे वितरण
सोलापूर (क.वृ.):- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील मोदी सरकार 2.0 च्या प्रथम वर्षपूर्ती अभियानातील घर संपर्क कार्यक्रमाचा भाजपच्यावतीले शुभारंभ करण्यात आला.
युवा नेते तथा दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे संयोजक मनिष देशमुख यांच्या हस्ते मतदारसंघातील शहरी भागात घरोघरी जाऊन पंतप्रधानांचे पत्र वितरित करण्यात आले. यावेळी भाजपा दक्षिण पश्चिम मंडल अध्यक्ष महेश देवकर, ज्येष्ठ नेते बाबुराव घुगे, मंडल सरचिटणीस आनंद बिराजदार,प्रभाकर पडवळकर, नगरसेविका राजश्री बिराजदार-पाटील, निर्मला घुगे, माजी शहर उपाध्यक्ष, अशोक पाटील, नितीन ठोंबरे, सुरेश माताडे, श्रीकट्टी जागीरदार, दत्तात्रय गडदे , बाबा कुलकर्णी, अजित रजपूत, दीपक चोपडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments