परिते येथील "उंबरकरांना" जडला भ्रष्टाचाराचा आजार,राजरोसपणे करतात धान्याचा काळाबाजार.
लाखोंच्या भष्ट्राचारावर गावची नजर,प्रशासन मात्र बेफिकीर
कुर्डवाडी (कालिदास जानराव) : जगभरासह देशात कोरोनाने हाहाकार माजविला असून,संपूर्ण देश यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाची संख्या वाढत आहे, संपूर्ण जनता जवळपास तीन महिने लॉक डाऊन मध्ये आहे. कोरोनाचा तांडव सुरूच आहे.संपूर्ण देशात लॉकडाऊनमुळे संपूर्ण अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे.सर्वसामान्यांच्या हाताला काम नसल्याने लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. ही उपासमार आणि लोकांना जगविण्यासाठी राज्य शासनाने बीपीएल कार्डधारकाबरोबरच केशरी रंगाच्या कार्डधारकांना ८रुपये किलो गहू आणि १२ रुपये किलो तांदूळ वाटपाचा निर्णय घेऊन त्याच्या अमलबजावणीचा आदेशही दिला आहे. असे असताना परिते ता.माढा येथील कायम गरीबांच्या टाळूवरील लोणी खावून मस्तपणे ढेकरा देणाऱ्या आणि नेहमीच तक्रारीच्या गर्तेत असणारा धान्य दुकानदार अजिनाथ उंबरकर हे केशरी कार्डधारकाला मिळणारे धान्य अल्प प्रमाणात वाटप करून जास्त पैसे घेत आहेत,कार्डधारकानीं जाब विचारला असता तुमचा माल आला नाही,मी कुणाला घाबरत नाही, तुम्हाला काय करायचे ते करा अशी मस्तवालपणाची आणि अरेरावीची भाषा वापरतात,अशी तक्रार परिते गावातील जवळपास पन्नास ते आठ केशरी कुटुंबंधारकांनी तहसीलदार माढा यांचेकडे प्रत्यक्ष निवेनाद्वारे आणि ऑनलाइन दिली असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. धान्याचा काळाबाजार करून मलिदा खाणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदार अजिनाथ उंबरकरवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी ही अन्याग्रस्त नागरिकांनी केली आहे.
स्वस्त
धान्य दुकानदारांना वेळ ठरवून दिलेली आहे.या वेळेतच धान्य वितरित करणे
गरजेचे असताना हे महाशय मात्र आपल्या वेळेनुसार धान्य वितरित करतात,आणि
नागरिकांना वेठीस धरतात असा आरोप ही नागरिकांनी केला आहे. केशरी
रेशनकार्डचे धान्य दिवसातून केवळ अर्धा तासच वाटप करतात.सदर दुकानदार ४००
ते ४५० कार्डधारकांना त्यांचे धान्य देत नसल्याची तक्रार ही नागरिकांनी
प्रशासनाकडे केली आहे. केशरी आणि बीपीएल कार्डधारक शासनाच्या योजनेपासून
वंचित आहेत.तहसीलदार, सर्कल, तलाठी, यांच्याकडे तक्रार करूनही सदर
दुकांनदाराविरोधात प्रशासन कोणतीही कारवाई करत नसल्याने गावकरी मात्र या
घटनेने अचंबित झाले आहेत.प्रशासनाच्या प्रत्येक घटकाला लक्ष्मीरूपी मलिदा
हे महाशय पोहचवीत असल्याने प्रशासन कोणतीही कारवाई करीत नसल्याची चर्चा ही
नागरिकांतून ऐकावयास मिळत आहे.
लाखोंचा धान्याचा अपहार करून स्वतःचे उथळ पांढरे करणाऱ्या या
स्वस्त धान्य दुकांनदारावर चौकशी करून फौजदारी करावी आणि या स्वस्त धान्य
दुकानाचा परवाना रद्द करावा, व नियमानुसार मिळणारे धान्य नागरिकांना मिळावे
अशा आशयाचे निवेदन राज्याचे अन्न व संरक्षणमंत्री छगन भुजबळ,जिल्हाधिकारी
सोलापूर,जिल्हा पुरवठा अधिकारी सोलापूर,तहसिलदार माढा व पुरवठा अधिकारी
माढा यांना परिते ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आले आहे. या मुजोर
दुकानदारावर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला
आहे.
$$
चौकट--ऐन लॉक डाऊन च्या काळात केशरी आणि बीपीएल धारकांना हक्काचे रेशन
देण्याऐवजी सदर दुकानदारांनी तो दिला नाही ,या दुकानदाराबद्दल आम्ही वरिष्ठ
पातळीवर तक्रारी दिल्या असून आम्हांला न्याय मिळेल, आणि भ्रस्ट
दुकानदारावर कारवाई होईल असा विश्वास आहे.
0 Comments