एम.आय.एम.पक्षाकडून चीनच्या राष्ट्रध्यक्षाची प्रतिमा जाळत जाहीर निषेध
अकलूज(क.वृ)- देशाच्या सीमेवर संधीसाधू चीनने समझोता कराराची अवहेलना करत भारतात घुसखोरी केली.भारतीय सीमेवरील गलवान खोर्यात चीनी सैनिकांनी सोमवारी रात्री केलेल्या हल्ल्यात भारताचे २० हून अधिक जवान शहिद झाले. शहिदांना सर्वप्रथम श्रद्धांजली अर्पण करून चीनचे राष्ट्राध्यक्ष यांच्या प्रतिमा जाळत अकलूज ग्रामपंचायत समोर एम.आय.एम.पक्षाकडून निषेध नोंदवण्यात आले.भारतीय सीमेवर होणारी चीनची घुसखोरी वेळोवेळी सुरूच आहे. आतापर्यंत भारताचे बहुसंख्य सैनिक शहिद झाले आहे.भारत सरकारने अशा लबाड व घातक चीनशी कसल्याही प्रकारचे व्यवसायिक व आर्थिक गुंतवणूकीचे संबंध ठेऊ नये. "हीच ती वेळ" चीनी वस्तूंचा बहिष्कार व हद्दपार करून धडा शिकवला जाऊ शकतो."चीन मुर्दाबाद " च्या घोषणा करत संतप्त समाज बांधवांच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला. सरकारने कारवाई करताना ' जशास तसे ' स्वरूपात उत्तर द्यावे. देशभरात चीनच्या विरोधात संतापाची लाट आहे ;अशा वेळी संपुर्ण देश सरकारच्या कारवाई करण्याच्या निर्णयावर पाठीशी उभे राहिल. असे एम.आय.एम.चे तालुकाध्यक्ष मोहसिन शेख यांनी सांगितले . यावेळी समीर काझी, सविल काझी, सागर जगताप,फारूख शेख,शोएब बागवान,मोहिद्दीन शेख,वसिम पटेल, सलमान कुरेशी, समीर कुरेशी आदी उपस्थित होते.
0 Comments