कोरोनाची पुन्हा एकदा सांगोल्याकडे धाव,निजामपूर येथे आढळला एक कोरोना पॉझिटिव्ह
सांगोला (प्रतिनिधी) : निजामपूर ता--सांगोला येथे दिनांक 24 मे 2020 रोजी सकाळी सहा वाजता एक इसम मुंबई सांताक्रुज येथून आलेला होता. सकाळी सदर इसमास निजामपूर येथील शाळेमध्ये संस्थात्मक विलगीकरणासाठी आणलेले होते. त्यावेळी सदर इसमास ताप, कधीतरी खोकला असा त्रास होत असल्यामुळे त्यास त्याच दिवशी ग्रामीण रूग्णालय येथे तपासणी करून सायंकाळी प्राथमिक आरोग्य केंद्र मेडशिंगी येथील कोविड केअर सेंटर मध्ये ठेवण्यात आलेले होते. त्याचे नमुने कोरोना विषयक चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याची कोरोना बाबतची चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली. सदरचा व्यक्ती मुंबईहून आल्यापासून लगेच त्याचे विलगीकरण करण्यात आलेले असल्याने त्याच्या निकटतम संपर्कात फक्त एक व्यक्ती आढळून आलेला आहे. सदर व्यक्तीस निजामपूर येथील शाळेत अलहिदा संस्थात्मक विलगीकरण करण्यात आलेले आहे. या व्यक्तीला मेडशिंगी येथील कोविंड केअर सेंटरमध्ये ठेवून संबंधित संपर्कातील व्यक्तीची कोरोना चाचणी घेण्यात येणार आहे. तसेच संबंधित व्यक्तीच्या घरातील अन्य तीन प्रत्यक्ष संपर्क न आलेल्या व्यक्तीचे खबरदारीचा उपाय म्हणून घरामध्ये विलगीकरण करून ठेवलेले आहे. करोना चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीची प्रकृती स्थिर व सुरक्षित असून संबंधित व्यक्तींच्या प्रकृतीकडे प्रशासन लक्ष ठेवून आहे.
तसेच मुंबई वरून मिरज मार्गे किडेबिसरी येथे येणाऱ्या एका व्यक्तीस कोरोनाची बाधा झाल्यामुळे त्यास मिरज येथे सिविल हॉस्पिटलला ठेवण्यात आलेली आहे. त्याच्या प्रत्यक्ष संपर्कातील दोन व अन्य एक व्यक्ती याना कोविंड केअर सेंटर मेडशिंगी येथे ठेवण्यात आलेली होते व त्यांची कोरोनाबाबतची चाचणी घेण्यात आलेली होती. सदर चाचणीमध्ये संबंधित बाधित व्यक्तीच्या संपर्कातील सर्व 3 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आढळून आलेले आहेत
0 Comments