Hot Posts

6/recent/ticker-posts

मकेचे हमीभाव खरेदी केंद्र चालू करा - रणजितसिंह मोहते पाटील यांची आग्रही मागणी

मकेचे हमीभाव खरेदी केंद्र चालू करा - रणजितसिंह मोहते पाटील यांची आग्रही मागणी 


 अकलूज (प्रतिनिधी):- सोलापूर जिल्हातील सर्व तालुक्यात मोठ्या प्रमाणात मकेचे ऊत्पादन शेतकरी बांधव घेतात .कोरोणा -19 मुळे पोल्ट्री व्यवसाय अडचणीत आला आहे . पोल्ट्री व्यवसाय मका कमी प्रमाणात खरेदी करत असल्यामुळे मकेचे दर रू1300/- प्रती क्विंटल पर्यंत खाली आलेले आहेत त्यामुळे जिल्हातील शेतकरीवर्गाचे खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. 
     केंद्राने मकेचा हमीभाव 1760/- रू  जाहीर केलेला आहे. त्या साठी सोलापूर जिल्ह्यात लवकरात लवकर मकेचे हमीभाव खरेदी केंद्र चालू करून शेतकरीवर्गाचे आर्थिक नुकसान टाळावे.शेतकरीवर्गाचे फळे व भाजीपाला पिकाचे दर कमी व त्या नाशवंत शेतीमालास ऊठाव नसले मुळे सदरचा शेतीमाल शेतात सडून जात आहे अशा परिस्थितीत मकेचे भाव पडल्यामुळे शेतकरी बांधव मोठ्या अडचणीत आलेला आहे .त्यामुळे मकेचे हमीभाव खरेदी केंद्र लवकर चालू करून शेतकरीवर्गाचे आर्थिक नुकसान टाळावे. या साठी केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद केली असून त्याचा लाभ आपल्या जिल्ह्यातील शेतकरी वर्गाला मिळवून दयावा अशी मागणी रणजितसिंह मोहते पाटील यांनी केली आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments