लक्ष्मीनगर चे सुपुत्र सोमनाथ शिंदे यांचेकडून चाळीस कुटुंबांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप
सांगोला (जगन्नाथ साठे) लक्ष्मीनगर ता सांगोला येथील सुपुत्र सोमनाथ वसंत शिंदे (सहायक पोलिस निरीक्षक)रामतीर्थ पोलीस स्टेशन नांदेड यांनी समाजिकतेचे भान ठेवून आपण ही समाजाचे देणे लागतो या भावनेने आपल्या मूळ गावी चाळीस कुटुंबांना जीवनावश्यक वस्तुंचे किट वाटप केले. सदर किटचे वाटप त्यांचे वडील वसंत शिंदे,सरपंच नितीन नरळे,यांच्या हस्ते सोशल डिस्टन्स ठेवून वाटप करण्यात आले.
या वेळी उपसरपंच धनाजी नरळे,तलाठी विद्या शिंदे,ग्रामसेवक बाळासाहेब शिंदे,पोलीस पाटील सोमनाथ नरळे,तंटामुक्त अध्यक्ष नितीन नरळे,जन आक्रोश भ्रष्टाचार समितीचे जिल्हाध्यक्ष कैलास हिप्परकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.सदर किटमध्ये गहू,तांदूळ,साखर,तेल,शेंगदाणे, डाळ, मीठ,आदि वस्तुंचा समावेश होता. ऐन लॉक डॉऊन च्या काळात सर्वत्र रोजगार बंद असताना मदत केल्याने नागरिकांतून सोमनाथ शिंदे यांचे अभिनंदन होत आहे. तर येणाऱ्या काळात ही आपण सामाजिक कार्याला सहकार्याची भावना ठेवू,असे सोमनाथ शिंदे यांनी सांगितले. या पूर्वी ही ग्रामपंचायतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत गावातील दानशूर लोकांकडून मदत गोळा जवळपास तीस कुटुंबांना जीवनावश्यक वस्तुंचे किट वाटप करण्यात आले असल्याची माहिती सरपंच नितीन नरळे यांनी सांगितले.
या वेळी ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी,आशा वर्कर उपस्थित होते

No comments:
Post a Comment